जिल्हा आरोग्य यंत्रणा तातडीने सक्षम करा...विशाल पाटील : आरोग्य आणीबाणीच्या उंबरठ्यावर 

घनशाम नवाथे
Wednesday, 5 August 2020

सांगली-  जिल्ह्यात कोरोनाचे रूग्णांची संख्या वाढत असून काही ठिकाणी रूग्णांचे उपचाराविना हाल सुरू आहेत. काही ठिकाणी खाटा उपलब्ध नाहीत. जिल्ह्याचे आरोग्य आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. आरोग्य तातडीने सक्षम करावी. तसेच खासगी रूग्णालयातील लूट थांबवली जावी. या सर्वाची चौकशी व्हावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात रूग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येते. लॉकडाउनचा परिणाम शुन्य आहे. मृत्यूदर देखील दुप्पट झाला आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. माजी महापौर हारूण शिकलगार यांच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडला आहे. सामान्य लोकांना उपचारासाठी रूग्णालयाच्या दारात थांबत राहावे लागत आहे. तातडीने उपचार होत नाहीत अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय दिसून येत नाही. आरोग्य यंत्रणा सज्ज असून एक हजार खाटा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. परंतू हा दावा फोल ठरला आहे. कंटेनमेंट झोन निर्माण करताना देखील नियम धाब्यावर ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.'' 

ते पुढे म्हणाले, ""कंटेनमेंट झोन स्थानिक अधिकारी सूचवतात, त्याप्रमाणे तयार केले जातात. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यातूनच कंटेनमेंट झोन पाडून टाकण्याचा प्रकार घडला. प्रशासनाचा सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचे आरोप यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी केला होता. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय दिसून येत नाही. उपाययोजना करण्यात जिल्हा अपयशी ठरला आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्यातही समन्वय राहिला नाही. रॅपिड ऍन्टीजेन चाचण्यातून अनेक पॉझिटीव्ह रूग्णालयाकडे पाठवले जातात. परंतू तेथे खाटा नसल्यामुळे त्यांना ताटकळत बसावे लागते असे प्रकार काही ठिकाणी घडलेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अयशस्वी ठरल्याचे दिसून येत असून तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना दिला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे महसूलमंत्री थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enable the district health system immediately. Vishal Patil: On the threshold of health emergency