
वारणावती : चांदोली परिसरात दोन-तीन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. आकाशात काळे ढग जमा होत आहेत. या बदलामुळे मोर-लांडोरांचा केकारव ऐकू येऊ लागलाय. वातावरण आल्हाददायक बनले आहे. वारणावती (ता. शिराळा) येथील सल्लाऊद्दिन आत्तार यांच्या अंगणात तर रोज मोरांचं आगमन होत आहे. आत्तार कुटुंबीय रोज त्यांच्या दाणा-पाण्याची तजवीज करीत आहेत. त्यांची हजेरी नित्याचीच झाली आहे.