कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांचे अतिक्रमण; ताकारीतून उसाची पळवापळवी 

Encroachment of factories outside the work area; Sugarcane sprouts from Takari
Encroachment of factories outside the work area; Sugarcane sprouts from Takari
Updated on

वांगी : ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यातील ऊसतोडीसाठी कार्यक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांनी अतिक्रमण केले आहे. हजारो टन ऊस दररोज नेला जात आहे. नेलेल्या ऊसबिलातून ताकारीची पाणीपट्टी कपात होत नसल्याने शेतकऱ्यांचाही या कारखान्यांकडे ओढ आहे. मात्र त्यामुळे ताकारी योजनेची लाखो रुपये पाणीपट्टी बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. 

ताकारी योजनेतून दिवाळीपासून उन्हाळाभर येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यांतील बहुतांश जमीन बारमाही सिंचनाखाली आली. यामध्ये प्रामुख्याने 90 टक्के क्षेत्रावर ऊसशेती आहे. या भागात निचऱ्याची जमीन असल्याने चांगल्या प्रतीच्या उसाची निर्मिती होते. त्यावर सर्वच कारखान्यांचा डोळा असतो. दिवसेंदिवस ऊसक्षेत्रात वाढ होत असल्याने उपलब्ध ऊस नेताना कार्यक्षेत्रातील कारखान्यांची दमछाक होत आहे. परिणामी कर्नाटकसह परजिल्ह्यातील कारखाने भरभर हंगाम संपवून ताकारी लाभक्षेत्रात यंत्रणा आणून ऊस पळवत आहेत. हा ऊस नेणाऱ्या काही साखर कारखान्याकडून ताकारीची पाणीपट्टी कपात केली जात नाही. आपसूकच शेतकरी या कारखान्यांच्या यंत्रणेकडे घिरट्या घालत आहेत. 

सध्या परिसरांत बाहेरच्या कारखान्यांचे 25-30 ट्रक व ट्रॅक्‍टर आले असून मागील महिनाभरापासून ऊसतोडीचे "धूमशान' सुरू आहे. दररोज किमान 500 टन ऊस बाहेर जात आहे. व तेवढ्या क्षेत्राची पाणीपट्टी बुडत आहे, असे समोर येत असताना यावर पाटबंधारेचा कसलाही अंकुश नाही किंबहुना कोणकोणते कारखाने ऊस नेतायत याची साधी माहिती घेण्याची तसदी घेतली जात नाही असे समजते. असाच प्रकार वर्षानुवर्षे वाढत गेल्यास पाणीपट्टी वसुलीस "पूर्णविराम' मिळण्यास वेळ लागणार नाही. 

कपात न केल्यास कारखान्यास नोटीस...
ताकारी लाभक्षेत्रातून ऊस नेणाऱ्या सर्व साखर कारखान्यांकडे पाणीपट्टी कपातीची नावे व रक्कम कळवून पाठपुरावा करावा लागतो. कपात न केल्यास संबंधित कारखान्यास नोटीस बजवावी लागते. यावर्षी असे नियोजन केले आहे का ? याची माहिती आज मिळू शकली नाही. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli wall collapse
mistaken identity police case
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com