डॉलरचा नाद नडला; साडे दहा लाखांना व्यापारी बुडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

सुनील भूपाल सन्नके (वय 49) हे शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत राहतात. त्यांचा गुजरीत व्यवसाय आहे. ते परकीय चलन बदलून देण्याचेही काम करतात. स्टीव्ह गॉडवीन डी हा ताराराणी चौक परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याने काल पहाटेच्या सुमारास सन्नके यांच्याशी संपर्क साधला.

कोल्हापूर : अमेरिकन डॉलर बदलून घेण्याच्या बहाण्याने बंगरूळमधील भामट्याने व्यापाऱ्याला 10 लाख 60 हजाराचा गंडा घातला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. स्टीव्ह गॉडवीन डी (रा. राममूर्तीनगर, बंगरूळ, कर्नाटक) असे त्या संशयित भामट्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सुनील भूपाल सन्नके (वय 49) हे शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत राहतात. त्यांचा गुजरीत व्यवसाय आहे. ते परकीय चलन बदलून देण्याचेही काम करतात. स्टीव्ह गॉडवीन डी हा ताराराणी चौक परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याने काल पहाटेच्या सुमारास सन्नके यांच्याशी संपर्क साधला. त्याने आपल्याला अमेरिकन 15 हजार डॉलरचे परकीय चलन बदलून पाहीजे असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी त्याची तयारी दाखवली. ते संबधित हॉटेलमध्ये गेले. त्यानी स्टीव्ह गॉडविन डी याची तेथील "मिटींग हॉल'मध्ये भेट घेतली. त्यांने आपल्याला 15 हजार अमेरिकन डॉलर बदलून पाहीजे असल्याचे सांगितले. त्याच्यावर सन्नके यांचा विश्‍वास बसला. त्यांनी त्याला 10 लाख 60 हजार 500 रूपयाचे भारतीय चलन त्याच्याकडे दिले.

त्याने त्याबदल्यात 15 हजार डॉलर सन्नके यांनी त्याच्याकडे मागीतले. तो रूममधून डॉलर, पासपोर्ट घेऊन येतो असे सांगून रूमच्या दिशेने गेला. पण पुन्हा परत आलाच नाही. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडेही चौकशी केली. शोधा शोध करूनही तो सापडला नाही. अखेरीस याबाबत रात्री त्यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित स्टीव्ह गॉडवीन डी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हॉटेलमधील सीसी टीव्ही आधारे आणि स्वतंत्र पथकाद्वारे संशयित भामट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur lost more than 10 lakhs in Foreign currency fraud in Kolhapur