एरंडोली, नरवाड पाणी योजना प्रकरणी दोषीवर कारवाई अटळ; सीईओंकडे तब्बल तीन तास सुनावणी

 Erandoli, Narwad water scheme case action against the culprit inevitable; CEOs have a whopping three-hour hearing
Erandoli, Narwad water scheme case action against the culprit inevitable; CEOs have a whopping three-hour hearing

सांगली : एरंडोली, नरवाड नळपाणी पुरवठा योजनांच्या तक्रारीप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तब्बल तीन तास सुनावणी घेतली. पाणीपुरवठा समिती, ठेकेदार, तांत्रिक पुरवठादार यासह सर्व संबधितांची बाजू ऐकूण घेत त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच असा इशारा देण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एरंडोली आणि नरवाड पाणी योजनेच्या चौकशीवरुन जोरदार वादावादी झाली होती. चौकशी अहवाल एकतर्फी व कोणाला तरी वाचवण्यासाठी कोणाचा तरी बळी देणारा आहे. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

चौकशी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी काही लोकांना जाणीवपूर्वक पांघरून घालत योजनेच्या अध्यक्ष, सचिवांना दाढेला दिले आहे. ही चौकशी पूर्वगृह दुषित आणि चुकीच्या पद्धतीने झाली आहे. हा चौकशीचा बोगस अहवाल आहे, असा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला. फेरचौकशीची मागणी करण्यात आली. जितेंद्र पाटील यांनी तर अशा पध्दतीने चौकशीचे अधिकारच नसल्याचा दावा केला. 

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांच्याकडे दोन्ही योजनांप्रकरणी सुनावणी घेतली. पाणी पुरवठा समिती, ठेकेदार, तांत्रिक पुरवठादार यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा समितीने याबाबत खुलासा करताना कामास झालेला विलंब हा जाणीवपूर्वक झालेला नाही. काही शेतकऱ्यांनी पाईपलाईनला केलेला विरोध, रेल्वे कामामुळे विलंब झाल्याचा दावा केला. सध्या योजनेचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळित असल्याचा खुलासा करण्यात आला. सुमारे तीन तास झालेल्या या सुनावणीय सर्व बाजू ऐकूण घेत याप्रकरणी दोषीवर कारवाई होईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले. 

पाणी योजना चौकशीचे मला अधिकार 
जिल्ह्यातील नळपाणी योजनांच्या चौकशीचे मला अधिकार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पाणी योजना अपुरी असणे, दिरंगाई, तसेच योजनेतील गोलमाल याबाबत चौकशी करता येते. त्यासाठी कोणती समिती नियुक्त करावी, याबाबतचे अधिकार मला असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com