Residents gather near the spot
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Dogs : शाळेला निघालेल्या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; एरंडोलीत आठ जखमी, एक गंभीर
Stray Rabid Dog Attack : एरंडोलीत आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत तीन शाळकरी मुलांसह आठ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी शाळेला निघालेल्या मुलांवर अचानक हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
एरंडोली : पिसाळलेल्या कुत्र्याने आज तीन शाळकरी मुलांसह आठ जणांना चावा घेतला. ही मुले सकाळी शाळेला निघाली होती. त्यातील एकाला गंभीर जखम झाली आहे. गुंडेवाडी रस्त्यानजीक शहापुरे सुपर मार्केटच्या समोर ही घटना घडली.

