कालेतील कुस्तीगीराच्या कुटूंबासाठी धावली माणुसकी 

सचिन मोहिते 
रविवार, 14 जानेवारी 2018

काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा ) : आकाशच्या प्रत्येक आठवणी आज ताज्या होत होत्या, त्या सांगताना प्रत्येकाच्या डोळाच्या कडा पाणावलेल्याच दिसल्या, अनेकांना हुंदका आवळता आला नाही, येथील राष्ट्रीय कुस्तीगीर आकाश देसाई याच्या रक्षा विसर्जनाला जमलेल्या जनसमुदायाचीच प्रातिनिधिक प्रतिक्रीया दिसत होती. भविष्यातील महाराष्ट्र केसरीच हरपल्याची मुक भावना जमलेला जनसमुदाय व्यक्त करत होता. अशा प्रसंगातही माणूसकीचा गहीवर आज पहावयास मिळाला. आकाशच्या मृत्यून ढासाळलेल्या त्याच्या कुंटूबाला सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. त्यात कालेतील सर्व देसाई परीवार व सम्राट युवा मंचतर्फे एक लाखाची मदत देण्य़ात आली.

काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा ) : आकाशच्या प्रत्येक आठवणी आज ताज्या होत होत्या, त्या सांगताना प्रत्येकाच्या डोळाच्या कडा पाणावलेल्याच दिसल्या, अनेकांना हुंदका आवळता आला नाही, येथील राष्ट्रीय कुस्तीगीर आकाश देसाई याच्या रक्षा विसर्जनाला जमलेल्या जनसमुदायाचीच प्रातिनिधिक प्रतिक्रीया दिसत होती. भविष्यातील महाराष्ट्र केसरीच हरपल्याची मुक भावना जमलेला जनसमुदाय व्यक्त करत होता. अशा प्रसंगातही माणूसकीचा गहीवर आज पहावयास मिळाला. आकाशच्या मृत्यून ढासाळलेल्या त्याच्या कुंटूबाला सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. त्यात कालेतील सर्व देसाई परीवार व सम्राट युवा मंचतर्फे एक लाखाची मदत देण्य़ात आली. त्याहीपेक्षा जास्त मदत देण्याचे कुटूंबास सर्वोतपरी मदत करण्याच्या भावना अनेकांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या.

शनिवारी पहाटे काले व मालखेड सह पश्चिम महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेवर काळाने घावा घातला. एेन तारूण्याच्या उंबरठ्यावर असणारे पाच जण दुर्दर्वी अपघातात मृत्यू पावले. अन सारा महाराष्ट्र थबकला. त्यात काले व मालखेड, साळशिरंबे, येणपे या कराड दक्षिण विभागातील मल्ल होते. त्यातील कालेचा आकाश देसाई व मालखेड चा सौरभ माने यांचे निधन झाले. तर कालेचा अनिल पाटील, साळशिरंबेचा रितेश चोपडे व येणपेचा सुदर्शन जाधव हे जखमी झाले आहेत. शनिवारी सौरभ व आकाश वर अत्यसंस्कार झाले. आज त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. अत्यंत गरीब परीस्थितीतुन मुलाला चांगला पैलवान बनवण्याचे स्वप्ने बाळगून आई वडीलांनी भाजीपाला विकून मुलांना वाढवले त्याच्या खेळाला प्रोत्साहन दिले. परिस्थितीची जाणीव असतानाही मुलांना त्याची जाणीव होवू दिली नाही. या दु:खाने न भरून निघणारी पोकळी आहे. पैशाने दु:ख कधीच विकत घेता येत नाही. पण ढासळलेल्या घराला उभं करायला पुन्हा त्या कुटूंबांना लढावं लागणार आहे. हे जरी खरे असले तरी कुणासाठी लढावं.का म्हणून झगडावं हा प्रश्न असताना त्यांच्या दुखाला थोडीशी फूंकर मारावी व त्यांच्या दुखातून त्यांना सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी कालेतील सर्व देसाई परीवार व सम्राट युवा मंच च्या वतीने एक लाख रूपये व त्याहून अधिक मदत देण्याचे, कुटूंबास सर्वोपरी मदत करणार असल्याचे शरद लाड यांनी श्रद्दांजली मनोगत मध्ये सांगितले. मालखेडच्या सौरभच्या कुटूंबास क्रांती कारखान्याच्या वतीने एक लाखाची मदत देऊ केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती परीषदेच्या वतीने अपघातात मृत्यू पावलेल्या मल्लांना व जखमींच्या कुटूंबास राज्य शासनाने प्रत्येकी पाच लाख रूपये मदतीचा हात देऊ करण्याची मागणी करणार असल्याचेही येथे सांगण्यात आले. पैशाने कुटूंबाचे दु: ख न संपणारे असले तरी आकाश व सौरभ च्या आठवणीतील ही एक मायेची आठवण या दोन कुटूंबास नक्की उभारी देईल हे मात्र नक्कीच. या मदतीतुन अनेकांनी सामाजीक बांधीलकी दाखवून नवा आदर्श घातला आहे.

सोशल मिडीयाही, दु:खात
प्रत्येक गावातील मोबाईलवरील व्हॉट्सअप व फेसबुकवर पैलवानांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत होती. कऱ्हाडसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान मित्रांचा ग्रूपवर मल्लांच्या अपघाताचा मेसेज सर्वत्र फिरला अनं संक्रातीचा गोड संदेशाची जागा त्यांच्या श्रद्धांजलीच्या मेसेजने घेतली. परीसरातील एकाही ग्रूप वर संक्रात मेसेज फिरला नाही. त्यामुळे या भागातील सोशल मिडीयाही दुःखात असल्याचे दिसून आले. 

Web Title: esakal marathi news 5 wrestler dead accident