जीवनावश्‍यक वस्तू-सेवा घरपोहच हव्यात तर फक्त फोन करा.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रशासनाने जीवनावश्‍यक वस्तू सेवा घरपोहच देण्यासाठी यंत्रणा सुरु केली आहे.

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रशासनाने जीवनावश्‍यक वस्तू सेवा घरपोहच देण्यासाठी यंत्रणा सुरु केली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जीवनावश्‍यक वस्तू (किराणा, भाजीपाला, दूध, औषध) घरपोच देण्याची सेवा केली आहे. नागरिकांनी संचारबंदी काळात घराबाहेर पडू नये व या सेवेचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक- औषधे -9325251555, किरकोळ किराणा-9823180070, भाजीपाला -9970555570, दुध -9822132222, इतर सेवेसाठी -9423871888
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essential goods and services If you want a home, just call