बेळगावला कोरोना लस संग्रहित केंद्राची स्थापना; पुणे, हैद्राबाद आणि चेन्नईहून येणार लस

Establishment of Corona Vaccine Storage Center at Belgaum by District Health and Family Welfare Department
Establishment of Corona Vaccine Storage Center at Belgaum by District Health and Family Welfare Department
Updated on

बेळगाव: देशामध्ये जानेवारी तिसऱ्या आठवड्यात कोविड-19 वर लस बाजारात येण्याची शक्‍यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागातर्फे बेळगावात कोरोना लस संग्रहित केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामध्ये पुणे, हैद्राबाद आणि चेन्नईहून लस येणार असून, येथून विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कारवार, कोप्पळसह बेळगाव जिल्ह्यात लस वितरीत करण्यात येईल. दरम्यान, लस संग्रहितसाठी स्वतंत्र कक्ष (वॉक इन कलर, वॉक इन प्लेझर) आहे. 

आरोग्य विभागातर्फे लस संकलन आणि वितरणासाठी पुरक तयारी केली आहे. 180 डीप फ्रीझर आणि आईसलाईन रेफ्रिझरेटर (आयएलआर) बसविले आहेत. त्याचा उपयोग प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुका केंद्रात केला जाईल. लस संकलन केंद्र जिल्हा आरोग्याधिकारी आणि जिल्हा रुग्णालयात असेल. सरकारी, खासगी डॉक्‍टरांसह सहाय्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस मिळणार आहे. जिल्ह्यात सरकारी 195, 1,521 खासगी रुग्णालये आहेत. दोन्ही मिळून 28,195 जणांना पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना लस दिली जाणार आहे. लस विकसीतसाठी मानवी चाचणी सुरु आहे. देशातील विविध संस्थांसह विदेशी संस्था लस विकसीतसाठी झटत आहेत.

संस्थातर्फे पहिल्या दोन टप्प्यात मानवी चाचणी करण्यात आली होती. ती यशस्वी ठरली. सकारात्मक परिणाम दिसले. तिसरी चाचणी सुरु आहे. यानंतर लशीची अधिकृत घोषणा केली जाईल. जानेवारी तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बाजारामध्ये लस येण्याची दाट शक्‍यता आहे. त्याअनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. 

''कोरोनावरील लस विकसीतचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लस संकलन केंद्र आणि लस पहिल्या टप्प्यात कोणाला द्यायची, त्याची तयारी झाली आहे. कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.'' 
एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा आरोग्याधिकारी 

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com