ओढ्यातील जाडीभरड्या वाळूलाही आता सोन्याचा भाव

Even the coarse sand in the stream now has a gold price
Even the coarse sand in the stream now has a gold price
Updated on

सांगली : ओढ्यातील जाडीभरडी वाळूही आता सोन्याच्या भावाने विकली जात आहे. त्यातून कोट्यवधीची काळी माया जमा होत आहे. या काळ्या बाजारात अनेकजण घुसले आहेत. मध्यंतरी काही कारणाने ओढ्यातून तस्करांनी काढता पाय घेतला होता. आता पुन्हा तस्कर ओढ्यात घुसले आहेत. महसूल विभागाला त्यांनी उघड आव्हान दिले असून मिरजेचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्यासमोर ही तस्करी मोडून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांनी स्थानिक यंत्रणावर विश्‍वास ठेवल्याने तस्करी वाढली आहे. 

मिरज पूर्व भागातील प्रमुख ओढ्यांना वाळू तस्करांनी लक्ष केले आहे. वाळूला सोन्याचा भाव आला आहे. बांधकाम वाढली आहेत. कृत्रिम वाळूमुळे ती आता सहज झाली असली तरी काही भागांत वाळूच लागते. ओढ्यातील वाळू जेसीबी यंत्राने काढली जाते. ट्रॅक्‍टर आणि ट्रकच्या माध्यमातून ती बाहेर नेऊन विकली जाते. ही वाळू माती मिश्रित आहे. तिला पुढे थेट किंमत येत नाही. त्यामुळे नदीकाठावरील काही भागांत वाळू धुण्याची केंद्र तयार झाली आहेत. तेथे वाळू धुतली की माती निघून जाते. त्यावर डिझेलचा थोडा फवारा मारला जातो. जेणेकरून वाळू चांगलीच चमकून उठते. या वाळूच्या एका ट्रकसाठी साठ ते सत्तर हजार रुपये मिळतात. त्यातून वाळू तस्कर गब्बर झाले आहेत. प्रत्येकाला त्याचा तुकडा टाकून त्यांनी यंत्रणा हाताळण्याचे कसब जाणले आहे. त्यातून काही टोळ्या तयार झाल्या असून हाणामारी, काटा काढणे आदी कार्यक्रम सुरुच आहेत. 

या तस्करीची कल्पना स्थानिक पातळीवरील महसूल यंत्रणाला आहे. त्यांनी याआधी छापे टाकून दंडही केले आहेत, मात्र त्यानंतरही पुन्हा तस्कर ओढ्यात घुसले आहेत. त्यामुळे तहसिलदार डी. एस. कुंभार यांच्यासमोर ही तस्करी मोडून काढण्याचे मोठे आव्हान आहे. तस्करांचे हे रॅकेट मोडून काढण्यासाठी श्री. कुंभार कडक भूमिका घेतात की स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांवरच भरवसा ठेवतात, याकडे लक्ष असणार आहे. 

रात्रीस खेळ चाले :
मिरज पूर्व भागात रात्री दहानंतर खेळ सुरू होतो आणि पहाटे पाचपर्यंत चालतो. या काळात वाळू, मुरमाची प्रचंड प्रमाणात तस्करी सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात महसूल विभाग साफ अपयशी ठरला आहे. मुरमाची रॉयल्टी बुडते आहेच, शिवाय काळा धंदा फोफावल्याने गुंडगिरीही वाढली आहे. त्यामुळे या व्यवस्थेचा पोलिसांनाही त्रास सुरू झाला आहे. 

"वाळू आणि मुरूम तस्करी खपवून घेतली जाणार नाही. जे कोणी हे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईलच. लोकांनी पुढे यावे आणि तक्रारी द्याव्यात. त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील.'' 
- डी. एस. कुंभार, तहसीलदार, मिरज 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com