शिवसेनेच्या माजी खासदारांचे पुण्यात निधन

शिवसेनेच्या माजी खासदारांचे पुण्यात निधन
Updated on

फलटण शहर  - कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, माजी खासदार, लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे पुणे येथे उपचारादरम्यान उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. माढा लाेकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ते वडील हाेत.

संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हिंदूराव नाईक निंबाळकर यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरु झाली होती. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले होते. शिवसेनेतून त्यांनी खासदारकी लढवून विजय प्राप्त केला होता. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या विजयाची घोषणा होताच, विजयाचा कुठलाही जल्लोष न करता त्यांनी पाणी प्रश्नासाठी सातारा ते शिंगणापूर अशी सलग तेरा दिवसांची पायी यात्रा काढली होती.

धोम-बलकवडी, नीरा-देवघर पाणी प्रश्न, लोणंद फलटण बारामती रेल्वे प्रश्न, लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग ही कामे पुर्णत्वास जावीत, या कामांना निधी मिळावा या साठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला होता. त्यांचा पिंड सामाजिक दृष्टिकोनाचा असल्याने ग्रामीण भागातील लोकांचा त्यांच्याशी थेट संपर्क होता. त्यांना माणनारा गट व कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू काल सायंकाळ नंतर त्यांची प्रकृती खालाविली अखेर आज (रविवार) पहाटे साडेतिनच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (रविवार) सायंकाळी ४ वा. मलठण, फलटण येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
why milk collection is falling in Sangli
dead chickens thrown from bypass bridge in Sangli
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com