esakal | चला कऱ्हाड कऱ्हाडऽऽऽ! माजी खासदार राजू शेट्टी बनले वडाप चालक
sakal

बोलून बातमी शोधा

Ex MP Raju Shetty inaugurates Swabhimani Sangathan Passenger traffic namespace

राजू शेट्टी यांनी चक्क वडापच्या गाडीत बसून कोण कराडला येणार आहे का? चला चला बसा लवकर कोण आहे काss अशी आरोळी देत तमाम महाराष्ट्रातील वडाप वाहतूक करणाऱ्या अनेक चालकांच्या आयुष्याला उभारी दिली. ही त्यांची हाळी वडाप चालकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. 

चला कऱ्हाड कऱ्हाडऽऽऽ! माजी खासदार राजू शेट्टी बनले वडाप चालक

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले (जि. सांगली) - चला चला कराssड कोण येणार आहे काss? बसा वडाप चाललंय, कोण आहे काss? अशी आरोळी दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी! निमित्त होते स्वाभिमानी प्रवाशी वाहतूक संघटनेच्या नामफलकाचे. नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते स्वाभिमानी संघटनेच्या प्रवासी वाहतूक नामफलकाचे उद्घाटन झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी चक्क वडापच्या गाडीत बसून कोण कराडला येणार आहे का? चला चला बसा लवकर कोण आहे काss अशी आरोळी देत तमाम महाराष्ट्रातील वडाप वाहतूक करणाऱ्या अनेक चालकांच्या आयुष्याला उभारी दिली. ही त्यांची हाळी वडाप चालकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. 

हे पण वाचा - ...त्यामुळे आता महाराष्ट्रातील महिला होणार अधिक सुरक्षित 

दिवसभर कष्ट करून वाहतुकीतून मिळालेले चार पैसे आपल्या कुटुंबासाठी वडापवाले खर्च करतात. त्यांच्या या राबवण्याचं महत्त्व लोकांना समजावं. पोलिस, इतर प्रशासन यंत्रणा, एसटी अधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक देऊ नये. असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. शेट्टी यांनी यावेळी स्वतः रिक्षा चालवली व प्रवाशांना भावनिक साद घातली. यामुळे प्रवाशी वाहतूक संघटनेचे अनेक कार्यकर्ते आनंदी झाले. अलिकडे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी वाढली आहे. यात कराड इस्लामपूर आदी शहरांना जोडणाऱ्या मार्गावर वडापाव वाले मोठ्या प्रमाणात व्यवसाय करताना दिसून येतात. परंतु, काही कारणास्तव वडाप करणाऱ्या चालकांना त्रास सहन करावा लागतो. गाडीचे हप्ते, वाहतुकीत वाढलेली स्पर्धा, त्यामुळे वडाप वाहतूक गंभीर बनली आहे. याची जाणीव प्रशासनाला व्हावी म्हणून शेट्टी यांनी रिक्षा चालवली. वाहतूक संघटना नामफलकाचे उद्घाटन प्रसंगी नेर्ले महामार्गावर अक्षरशः वडाप चालक प्रवाशांना कसे हाक मारतात तशी आरोळी महामार्गावर राजू शेट्टी ठोकली. त्यामुळे सर्व जण अचंबित झाले. एकूणच संघटनेच्या पाठीशी आपण आहोत. प्रवासी वाहतूक चालकांची संघटना असेल तर आपलं कोणीही वाकड करू शकणार नाही. आपल्याला त्रास देणार नाही. रीतसर परवाना असताना कोणीही घाबरू नये. असे मत शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

हे पण वाचा - अँगलिंग फिशिंग म्हणजे काय ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे वडाप चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक आंदोलने करणाऱ्या राजू शेट्टींचा हा नवा 'वडाप चालकाचा' अवतार बघून लोकांमध्ये राजू शेट्टी यांची चर्चा होती. यावेळी वाहतूक संघटना स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  तानाजी साठे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोक बल्लाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा सरचिटणीस धैर्यशील पाटील,  देवेंद्र धस उपस्थित होते. नेर्ले अध्यक्ष मारुती गवळी, उपाध्यक्ष संभाजी लोकरे, खजिनदार सचिन सूर्यवंशी, सचिव इम्रान मुल्ला , तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, विजय वहाळ, सर्जेराव शिंदे, किरण पाटील, संतोष पाटील, अण्णा तोडकर, संतोष शिंदे, दादा फडतरे, शिवाजी पवार, नरेंद्र पाटील, गोरख जाधव, संदीप पाटील, विश्वास जाधव, भगवान देवकर, विठ्ठल जानकर, धनाजी कांबळे, मारुती वरेकर, अवि चव्हाण, रवी रोकडे, गुंडा वारे, कृष्णात वारे, सुभाष सूर्यवंशी, दिलीप सावंत, प्रमोद हीमने, राजू मुलानी, सुनील चव्हाण, बाजीराव पाटील, सुभाष कदम, अमर मुलानी, इब्राहिम मुलानी, आत्माराम देवकर, दत्ता वाडेकर, सुशांत नलवडे, पिंटू चव्हाण, जयसिंग माने, संदीप माने व इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.