माजी सैनिकांचे टास्क फोर्स...कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई 

बलराज पवार
Thursday, 16 July 2020

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अतिउत्साही नागरिक करत आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी 10 माजी सैनिकांचे टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्सने आज शहरात संचलन केले. महापालिका क्षेत्रात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर हा फोर्स दंडात्मक कारवाई करणार आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याची गरज असतानाही कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी 10 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. हे माजी सैनिक आजपासून महापालिका सेवेत दाखल झालेत.

लष्करी गणेवशातील या टास्क फोर्सने आज शहरातील बाजारपेठेत संचलन करुन नागरिकांना सोशल डिटन्स पाळणे, मास्क वापरणे तसेच रस्त्यावर न थुंकणे याबाबत जागृती केली. टास्क फोर्सकडून सोशल डिस्टन्सचे पालन न करणारे, मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

पहिल्याच दिवशी 15 जणांवर कारवाई 

टास्क फोर्सने आज बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 जणांवर कारवाई केली. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या 12 जणांवर तर विना मास्क तीन जणांवर कारवाई करीत प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.  

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-servicemen's task force .Action will be taken against those violating Corona rules