जिल्ह्यातील 136 गुन्हेगारांचे आदान-प्रदान...हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार 

घनश्‍याम नवाथे
Friday, 9 October 2020

सांगली- पोलिस दफ्तरी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर हालचालींवर नजर ठेवणे सोपे जावे यासाठी आज गुन्हेगार अदान प्रदान कार्यक्रम पोलिस मुख्यालय व उपविभागीय कार्यालयात झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 136 गुन्हेगारांना हजर ठेवण्यात आले होते. 

सांगली- पोलिस दफ्तरी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर हालचालींवर नजर ठेवणे सोपे जावे यासाठी आज गुन्हेगार अदान प्रदान कार्यक्रम पोलिस मुख्यालय व उपविभागीय कार्यालयात झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 136 गुन्हेगारांना हजर ठेवण्यात आले होते. 

नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्यांच्या हद्दीतील मालमत्तेविरुध्दचे दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हजर ठेवून आदान-प्रदान कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवता यावे यासाठी हा उपक्रम ठराविक दिवसानंतर राबवला जातो. 

सांगली व मिरज उपविभागातील आदान प्रदान कार्यक्रम पोलीस मुख्यालयात घेण्यात आला. त्यासाठी अप्पर अधीक्षक दुबुले, सांगलीचे उपाधीक्षक अजित टिके व मिरजेचे उपाधीक्षक अशोक विरकर, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि गुन्हे अन्वेषण, गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 51 गुन्हेगारांना याठिकाणी हजर ठेवले होते. जत उपविभागात उपाधीक्षक रत्नाकर नवले आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, डीबीचे कर्मचारी आणि 11 गुन्हेगार उपस्थित होते. तासगाव विभागात उपाधीक्षक अश्विनी शेडगे, पोलीस ठाणे अधिकारी आणि डीबी कर्मचाऱ्यांसह 30 गुन्हेगार उपस्थित होते. 

इस्लामपुर विभागात उपाधीक्षक कृष्णात पिंगळे आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत 30 गुन्हेगारांचा आदान-प्रदान कार्यक्रम झाला. विटा विभागात उपाधीक्षक अंकुश इंगळे आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह 14 गुन्हेगार उपस्थित होते. आदान-प्रदान कार्यक्रमासाठी सहा उपाधीक्षक, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक, 25 अधिकारी, गुन्हे प्रकटीकरणचे 29 अधिकारी आणि डीबीचे 74 कर्मचारी व 136 गुन्हेगार हजर होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exchange of 136 criminals in the district. movements will be closely monitored