खळबळजनक, पाथरीकर म्हणतात बाबा आमचेच, शिर्डीकरांकडे पुरावाच नाही

Excruciating, Patharikar says Baba Ours, Shirdikar has no proof
Excruciating, Patharikar says Baba Ours, Shirdikar has no proof
Updated on

नगर ः पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे, असे मानायला शिर्डीकर तयार नाहीत. पाथरीकरांच्या दाव्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. पाथरीला निधी द्यायला विरोध नाही. परंतु तेच जन्मस्थान असल्याचे मान्य नाही. त्या अनुषंगाने निधी दिला तर त्याला विरोधच असेल. याबाबत गावकऱ्यांनी रविवारपासून बंदचे आवाहन केले आहे. 

पाथरी आणि शिर्डी अशा वाद सुरू झालेला असताना साईबाबा संस्थानने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. संस्थान साईचरित्रच प्रमाण मानते. त्यामुळे अर्थातच ते शिर्डीच्या गावकऱ्यांच्या भूमिकेशी पूरक आहेत. 


साई जन्मभूमीचा दावा करणाऱ्या पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नऊ जानेवारीला औरंगाबादेत शंभर कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर येथील साई मंदिरात सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरिकांची बैठक झाली. त्या वेळी आमदार दुर्राणी बोलत होते. विकासासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी आमदार दुर्राणी यांचीच निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, मंदिर विश्वस्त संजय भुसारी, शिवसेना तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे आदी उपस्थित होते. 

पाथरीत 29 पुरावे 
""पाथरी ही साई जन्मभूमी असल्याचे आमच्याकडे 29 पुरावे आहेत. शिर्डीकरांकडे एकही पुरावा नाही. आम्हाला वाद घालायचा नाही, तर जन्मभूमी असल्याने पाथरीचा विकास साधायचा आहे,'' असे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरूवारी (16) स्पष्ट केले. 

साईचरित्रात फेरफार 
आमदार दुर्राणी यांनी साई मंदिराच्या पायाभरणीपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा मांडला. ते म्हणाले, ""साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी या मंत्राप्रमाणे तीस वर्षांनंतर फळ मिळत असून, त्यालाही शिर्डीकरांकडून विरोध केला जात आहे. अनेक पुस्तकांतील जुने पुरावे लपविण्याचे काम शिर्डी संस्थानकडून होत आहे. साईबाबा एकच असून, पाथरीचा विकास झाल्यास शिर्डीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे त्यांनी मोठ्या मनाने पाथरी ही जन्मभूमी मानावी.'' 

संजय भुसारी यांनी साईबाबांच्या पाथरीतील जन्मभूमीबाबत माहिती देत विकासासाठी कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते आमदार दुर्राणी यांची निवड करण्यात आली. बैठकीला पाथरी तालुक्‍यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, वकील, डॉक्‍टर, पत्रकार, व्यापारी, तसेच हजारो भाविक उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?
Why are women paying extra for NCMC cards?
Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting
Who is Tukaram Mundhe?
Marathi News Esakal
www.esakal.com