स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणादणून गेला. नेमके काय घडले, आवाज कोठून आला, हे रहिवाशांना कळले नाही. रहिवासी, महिला, तरुण घरातून बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले.
सांगली : सकाळी साडेदहाची वेळ होती. काल रविवारची सुटी. सारेच घरात ‘एन्जॉय’च्या मूडमध्ये होते. गावभागातील बावडेकर वाड्याजवळ अचानक मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला अन् अख्खा परिसरात रस्त्यावर आला. परिसरातील दहा-एक सदनिकांच्या खिडकीच्या काचा फुटल्या, दोन चारचाकी वाहनांच्या काचांना तडे गेल्याने नागरिक भयभीत झाले. तत्काळ आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीने झालेल्या स्फोट (Gas Cylinder Explosion) झाल्याचे समोर आले.