esakal | या प्राण्याच्या पिलावर केली नेत्रशस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

 Eye surgery done on kitten in sangali

तीन-चार महिन्यांच्या मांजराच्या पिल्लू. अज्ञात कारणातून त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर मार लागला. डोळा निकामी झाला आणि जगण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली

या प्राण्याच्या पिलावर केली नेत्रशस्त्रक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

सांगली : तीन-चार महिन्यांच्या मांजराच्या पिल्लू. अज्ञात कारणातून त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर मार लागला. डोळा निकामी झाला आणि जगण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली.

सजग नागरिकांनी त्याला ऍनिमल सहारा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे सोपवले. त्याच्याव ऍनिमल राईट फंडच्या माध्यमातून नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता त्याचा पूर्ण डोळाच काढून टाकला असून दुसऱ्या डोळ्यावरच त्याची आता भिस्त आहे. महिनाभराच्या उपचारांती आता त्याला दत्तक देण्यात देऊन पुनर्वसन झाले.

पंचशीलनगरमध्ये मांजराचे तीन-चार महिन्यांचे पिल्लू निर्मला साळुंखे यांच्याकडे होते. अज्ञात कारणातून त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. जखमी इतकी मोठी झाली. जगण्याची धडपड सुरू असताना ऍनिमल सहारा फाऊंडेशनचे अजित काशीद, पुष्पा काशीद यांच्याकडे ते पिल्लू देण्यात आले.

त्यांनी ऍनिमल राईट फंडचे व्यवस्थापक राहुल पाटील यांच्या मदतीने त्या मांजराची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. डोळा पूर्ण निकामी झाल्याने काढून टाकण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला.

त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी डॉक्‍टरांच्या देखरेखीत उपचार घेण्यात आली. पंधरा दिवसांनंतर ते मांजराचे पिल्लू पुन्हा खेळू लागले. निर्मला साळुंखे यांनी त्याला दत्तक घेऊन आपल्या घरी नेले आहे. 

loading image