कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी  जिल्ह्यात 1583 बेडस्‌ची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

विष्णू मोहिते
Wednesday, 26 August 2020

सांगली- कोरोना उपचारासाठी सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयेही उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत. अधिग्रहित करण्यात आलेल्या काही खासगी रुग्णालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी 398 आयसीयु बेडस्‌ तर 1185 वॉर्ड बेडस्‌ अशा एकूण 1 हजार 583 बेडस्‌ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

कोरोना उपचारासाठी हॉस्पिटलनिहाय उपलब्ध असलेले आयसीयु बेडस्‌, वॉर्ड बेडस्‌ व एकूण बेडस्‌ची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोविड हॉस्पीटल मिरज)- आयसीयु बेडस्‌ 96, वॉर्ड बेडस्‌ 202 असे एकूण 298 बेडस्‌, भारती हॉस्पीटल सांगली आयसीयु बेडस्‌ 39, वॉर्ड बेडस्‌ 111 असे एकूण 150 बेडस्‌, वॉनलेस हॉस्पीटल मिरज - आयसीयु बेडस्‌ 30, वॉर्ड बेडस्‌ 60 असे एकूण 90 बेडस्‌, वॉनलेस हॉस्पीटल मिरज प्रायव्हेट - आयसीयु बेडस्‌ 10, वॉर्ड बेडस्‌ 40 असे एकूण 50 बेडस्‌, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सांगली - आयसीयु बेडस्‌ 25, वॉर्ड बेडस्‌ 45 असे एकूण 70 बेडस्‌, मेहता हॉस्पीटल सांगली - आयसीयु बेडस्‌ 19, वॉर्ड बेडस्‌ 33 असे एकूण 52 बेडस्‌, मिरज चेस्ट सेंटर मिरज- आयसीयु बेडस्‌ 20, वॉर्ड बेडस्‌ 28 असे एकूण 48 बेडस्‌,

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल - आयसीयु बेडस्‌ 30, वॉर्ड बेडस्‌ 20 असे एकूण 50 बेडस्‌, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली आयसीयु बेडस्‌ 19, वॉर्ड बेडस्‌ 24 असे एकूण 43 बेडस्‌, श्वास हॉस्पीटल - आयसीयु बेडस्‌ 14, वॉर्ड बेडस्‌ 22 असे एकूण 36 बेडस्‌, दुधणकर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल - आयसीयु बेडस्‌ 11, वॉर्ड बेडस्‌ 29 असे एकूण 40 बेडस्‌, अदिसागर -वॉर्ड बेडस्‌ 120, उप जिल्हा रूग्णालय इस्लामपूर - आयसीयु बेडस्‌ 10, वॉर्ड बेडस्‌ 25 असे एकूण 35 बेडस्‌, सिव्हील हॉस्पीटल सांगली - आयसीयु बेडस्‌ 22, वॉर्ड बेडस्‌ 24 असे एकूण 46 बेडस्‌, विवेकानंद मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल बामणोली, कुपवाड, मिरज - आयसीयु बेडस्‌ 10, वॉर्ड बेडस्‌ 50 असे एकूण 60 बेडस्‌ उपलब्ध आहेत. 
तासगाव, जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, आष्टा व कोकरूड ग्रामीण रूग्णालयांमध्ये प्रत्येकी 25 वॉर्ड बेडस्‌ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उप जिल्हा रूग्णालय शिराळा - वॉर्ड बेडस्‌ 45, प्रकाश हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर इस्लामपूर - आयसीयु बेडस्‌ 30, वॉर्ड बेडस्‌ 75 असे एकूण 105 बेडस्‌, ओमश्री हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर विटा - आयसीयु बेडस्‌ 13, वॉर्ड बेडस्‌ 32 असे एकूण 45 बेडस्‌ उपलब्ध आहेत. 

या लिंकवर मिळेल माहिती... 
कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी शासकीय व अधिग्रहित केलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम संकेतस्थळ sangli.nic.in व smkc.gov.in/covid19 यावर उपलब्ध आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility of 1583 beds in the district for the treatment of Corona patients : Collector Dr. Chaudhary.