esakal | कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसदराच्याबाबतीत ठरवतात एक आणि वागतात एक
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant-Patil

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसदराच्याबाबतीत ठरवतात एक आणि वागतात एक, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा,

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसदराच्याबाबतीत ठरवतात एक आणि वागतात एक

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसदराच्याबाबतीत ठरवतात एक आणि वागतात एक, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. देशातील अतिरिक्त साखर उत्पादनाच्या समस्येवर राजारामबापू कारखान्याने इथेनॉल निर्मितीचा पर्याय पुढे आणल्याचेही त्यांनी सांगितले.
      
राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल शाखा व कारंदवाडी युनिटमध्ये मंत्री पाटील यांच्याहस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील,युवानेते प्रतिक पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, सभापती शुभांगी पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रमुख उपस्थित होते.
     
जयंत पाटील म्हणाले, "देशात २५० लाख क्विंटल साखरेचा खप असताना उत्पादन ३१० लाख क्विंटल होत आहे. ६० लाख क्विंटल अतिरिक्त उत्पादन होत आहे. गेल्यावर्षाची ११० लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. साखर निर्यातीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आपण वाटेगावसह साखराळे युनिटमध्ये इथेनॉलनिर्मितीवर भर द्यायला हवा. शेती विभागाचे कर्मचारी शेतात येवून उसाच्या नोंदी घेत असून शेतकऱ्यांना वर्षात ५-६ भेटी देवून मार्गदर्शन करणार आहेत. या वर्षात शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन करण्यास प्रोत्साहन देणार आहोत. आपण यावर्षी २५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केल्यास तसेच आपण करीत असलेल्या उपाययोजनांनी आपल्या संस्थेस आर्थिक सक्षमता येवू शकते. आपल्या कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनांना वीज बिलाचा मोठा भुर्दंड बसत असल्याने ३२ मेगावट सौरउर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करीत जलाशय साठे निर्माण करणार आहोत." 

अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले, "कोरोना बाधितांच्यासाठी कोरोना सेंटर उभारणार आहोत. केंद्रसरकारने एफआरपीमध्ये वाढ केली; मात्र साखरेचे दर वाढविले नाहीत. २०१८-१९ ची एफआरपी देण्यास काढलेल्या बँक व्याजाच्या ५० टक्के रक्कम दिलेली नाही. साखर निर्यात अनुदान ७३ कोटी ९२ लाख व बफरस्टॉक व्याजाचे ११ कोटी ७९ लाख रुपये अद्याप दिले नसल्याने आपला तिसरा हप्ता देण्यास विलंब झाला. आपण रुपये २०० दिले असून उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी निश्चितपणे देवू. आपण जतसह चार युनिटमध्ये २५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार आहोत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सर्वांनी सहकार्य करावे." उपस्थित होते.


 

loading image