कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ...या हॉस्पिटलमधील तीन कर्मचाऱ्यांवर "मेस्मा" अंतर्गत गुन्हा 

शैलेश पेटकर 
Wednesday, 5 August 2020

सांगली-  कोरोनासाठी उपचार देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी येथील मेहता हॉस्पिटलमधील तीन कर्मचाऱ्यांवर "मेस्मा' कायद्यान्वये विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करण आवळे (रा. कर्नाळ), प्रियांका पांढरे (कबसेडिग्रज) आणि मयुरी कांबळे (मांजर्डे, तासगाव) अशी त्या तिघांची नावे आहेत. "मेस्मा" कायद्यातंर्गत जिल्ह्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी फिर्याद दिली. 

जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील काही खासगी रुग्णालयात उपचार व्यवस्था सुरु केली आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना बाधितांवर उपचारास नकार देणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात एका रुग्णालयातील आठ जणांवर ही कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, सांगली शहरातील मेहता रुग्णालयातही कोरोना बाधितांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांरी सेवा बजावण्यास टाळाटाळ करत असल्याचे लेखी तक्रार डॉ. अजित मेहता यांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी चौधरी यांनी चौकशीचे आदेश आयुक्त नितीन कापडनीस यांना दिले होते. त्यानुसार आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे यांनी अहवाल सादर करत रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी कामास नकार दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार "महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005', "भारतीय साथरोग नियमन अधिनियम 1987', आणि "महाराष्ट्र इसेन्शियल सर्विसेस अँड मेंटेनन्स ऍक्‍ट 2007' या तीन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure to treat Corona patients . Crime under "Mesma" against three employees of this hospital