Fake Currency : बनावट नोटा छपाईप्रकरणी तिघांना अटक, टेंभुर्णीत पोलिसांचा छापा; 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

Police Operation : टेंभुर्णीत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर राहुरी व टेंभुर्णी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ६७.३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
Fake Currency
Fake CurrencySakal
Updated on

टेंभुर्णी : राहूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक लाख रूपयांच्या मोबदल्यात बनावट दोन लाख रूपयांच्या नोटा करून देण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या टेंभुर्णीतील घरावर राहूरी पोलीस व टेंभुर्णी पोलीस संयुक्त कारवाई करीत छापा टाकला असता या घरातून प्रिंटर, वेगवेगळे कागदपत्र, शाई, मशीन व रोख रक्कम 64 लाख 30 हजार रुपये तसेच या नोटा छापण्यासाठी लागणारे सुमारे 3 लाख रुपये किंमतीचे साहित्य असा एकूण 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com