श्रीगोंद्यात सापडला "मुन्नाभाई' 

संजय आ. काटे
बुधवार, 15 जानेवारी 2020

भानगाव येथे पत्र्याच्या खोलीत बिस्वास याने घरगुती दवाखाना सुरू केला होता. तेथेच पोलिसांनी छापा घालून हजारो रुपयांची औषधेदेखील जप्त केली. संक्रांतीच्या दिवशीच बोगस डॉक्‍टरवर कारवाई झाली. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीगोंदे : कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना, लोकांवर उपचार करणाऱ्या मुन्नाभाईस भानगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. गोपाळ बिस्वास (वय 42, पश्‍चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तो अलगद जाळ्यात सापडला. 

अवश्‍य वाचा- साईबाबा जन्मस्थानावरून वाद पेटला

भानगाव येथे पत्र्याच्या खोलीत बिस्वास याने घरगुती दवाखाना सुरू केला होता. तेथेच पोलिसांनी छापा घालून हजारो रुपयांची औषधेदेखील जप्त केली. संक्रांतीच्या दिवशीच बोगस डॉक्‍टरवर कारवाई झाली. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घरगुती दवाखान्यावर छापा

भानगाव येथे गोपाळ बिस्वास हा बोगस डॉक्‍टर असून, त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतानाही, तो रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे तक्रार केली. बुधवारी (ता.15) सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावीत यांच्यासह डॉ. खामकर व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या गोपाळ बिस्वास याच्या घरगुती दवाखान्यावर छापा घातला. 

हेही वाचा-  पारनेरचा कचरा अडकला जागेचा वादात

औषधविक्रेत्यांचीही चौकशी 

बिस्वास याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाच्या परवान्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलिस निरीक्षक गावीत म्हणाले, की संबंधित बोगस डॉक्‍टरच्या घरातून जवळपास 55 हजार रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, बोगस डॉक्‍टरांना औषधे पुरविणाऱ्या औषधविक्रेत्यांचीही चौकशी करू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake doctor caught in Shrigonda marathi news