अर्जुनवाडीत नर्सरीकडून शेतकऱ्यांना आंब्याची बनावट रोपे 

Fake mango seedlings to farmers from nursery in Arjunwadi
Fake mango seedlings to farmers from nursery in Arjunwadi

झरे : अर्जुनवाडी (ता. आटपाडी) येथील अजित खरात या शेतकऱ्याने आंब्याची 800 झाडे लावली होती. त्या पैकी अनेक रोपे गुच्छ रोग व इतर जातीची शैलेश नर्सरी (मलकापुर) यांनी दिली होती. या नर्सरीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

याबाबत खरात यांनी तालुका व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत आज जिल्ह्यातून शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी, तालुका कृषी अधिकारी पी. पी. पाटील, एस. एम. भोसले, एस. पी. लोखंडे, ए. एन. कांबळे, टी. के. माने, ए. एन. नलवडे, बी. एन. वाघमोडे यांच्या पथकाने आंबा लागवडीच्या रोपांची पाहणी केली. 

यावेळी भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रघुनाथ पिसाळ, उपाध्यक्ष महावीर कर्वे, जिल्हा मंत्री उदय राजोउपाध्याय, शेती परिवार कल्याण संस्थेचे प्रसाद देशपांडे, नर्सरी प्रतिनिधीअवधूत गोसावी उपस्थित होते. संपूर्ण 800 रोपाची पाहणी केली असता त्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त 38 रोपे सापडली, गुच्छ रोग असणारी 63 रोपे, तर केसर म्हणून इतर जातीची दिलेली 87 रोपे सापडली आहेत.नर्सरीतून अशा बोगस रोपांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

संपूर्ण रोपांची पाहणी केली असता गुच्छ रोग असणारे रोपे, केसर म्हणून इतर जातीची दिलेले रोपे व एक वर्षापुढील दिलेले रोपे आढळून आली आहेत. 
- शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज. 

पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी व शास्त्रज्ञ सर्वांनी मिळून रोपांची पाहणी केली आहे. प्रत्यक्ष दर्शनीचा अहवाल कमिटी पुढे ठेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. 
- पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी 

शैलेश नर्सरीमधून 800 रोपे आणून लागवड केली होती, त्यापैकी 87 रोपे इतर जातीची एक वर्षापुढील 38 सोपे व गुच्छ रोग असणारी 63 रुपये सापडली आहेत. नर्सरी मालकांनी फसवणूक केली आहे नुकसानभरपाई मिळावी. 
- अजित खरात, शेतकरी, अर्जुन वाडी. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com