भात खरेदी केंद्रासाठी शाहूवाडीत शेतकऱ्यांचे आंदोलन

भात खरेदी केंद्रासाठी शाहूवाडीत शेतकऱ्यांचे आंदोलन

पिशवी - शाहुवाडी तालुक्यांत शासकीय भात खरेदी केंद्र सुरू करण्याची वारंवार मागणी करूनही भात खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. तसेच व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने भात खरेदी करत आहेत. याच्या निषेधार्थ शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भात ओतुन तीव्र निदर्शने केली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 8 ऑक्टोबरला भात खरेदी केंद्र चालु करण्यासाठी व तालुक्यांतील व्यापाऱ्याकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यासंबंधी निवेदन तहसिलदार यांना दिले होते, पण 15 दिवस होऊन गेले तरीही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी तहसील कार्यालयासमोर  भात ओतुन तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

शासनाने भात पिकांला क्विंटलसाठी 1750 रूपये हमीभाव ठरवुन दिला आहे. असे असताना तालुक्यांत अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी 1300 रुपयेच पडत आहेत. खते, बियाणे व मशागत खर्च वाढत असताना तोटयांत असलेली भात शेतीला सावरण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून 1700 रुपये हमी भाव मिळवुन देण्यासाठी शासकीय भात खरेदी केंद्र चालु होणे गरजेचे असतात.  हंगाम संपत आला तरी शासनाची यासंबंधी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. व्यापारी सणासुदच्या तोंडावर नडलेल्या शेतकऱ्यांचा माल कमी किंमतीत घेत आहेत. यावर प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com