esakal | मिरज : विजेच्या धक्क्याने बेडग येथे शेतकऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज : विजेच्या धक्क्याने बेडग येथे शेतकऱ्याचा मृत्यू

मिरज - बेडग येथे शेतामध्ये भाररहित विजेचा तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शत्रुघ्न हुवाप्पा कांबळे ( वय 70) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मिरज : विजेच्या धक्क्याने बेडग येथे शेतकऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज - बेडग येथे शेतामध्ये भाररहित विजेचा तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शत्रुघ्न हुवाप्पा कांबळे ( वय 70) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

श्री. कांबळे आज सकाळी शेताकडे गेले होते. मालगाव रस्त्यावर त्यांची पाऊण एकर शेती आहे. कुपनलिकेसाठी त्यांनी वीजजोड घेतला आहे. तेथील ट्रान्स्फार्मर सुमारे दिड महिन्यांपासून बंद होता. काल संध्याकाळी तो महावितरण कर्मचाऱ्यांनी नव्याने बसवला. आज सकाळी वीजपुरवठा सुरु करण्यासाठी शत्रुघ्न वीजपेटीकडे गेले होते. त्यावेळी पेटीमध्ये शाॅर्टसर्कीट होऊन ती जळाल्याचे लक्षात आले. तेथून परतत असताना पेटीजवळूनच गेलेल्या तारेला स्पर्श झाला. मोठा धक्का लागून ते तडफडत कोसळले. त्यांचा पुतण्या बबन यांचे लक्ष गेले. त्यांनी आरडाओरड करुन शेजाऱ्यांना गोळा केले. शत्रुघ्न यांना बाजुला काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सकाळी पंचनामा केला. दुपारी मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. 

भावजयीच्या रक्षाविसर्जनादिवशीच दिराचा मृत्यू

श्री. शत्रुघ्न यांची लहान भावजय कमल यांचा दोन दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. आज शेतातच रक्षाविसर्जन होते. त्याचवेळी शत्रुघ्न यांच्या मृत्यूचाही दुर्दैवी प्रसंग ओढवला. 

loading image
go to top