ब्रेकिंग : कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी; तरूण शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पन्हाळा येथे तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. प्रमोद जमदाडे असे आत्महत्या केलेल्या शेकतऱ्याचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबड्याच्या प्रकल्पासाठी पैसे भरले होते. परुंतु, रयत ऍग्रो कंपनीत झालेल्या घोटाळ्यामुळे त्यांचे नुकसान झाले आणि त्यातून आलेल्या नैराश्‍यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

कोल्हापूर - पन्हाळा येथे तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. प्रमोद जमदाडे असे आत्महत्या केलेल्या शेकतऱ्याचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबड्याच्या प्रकल्पासाठी पैसे भरले होते. परुंतु, रयत ऍग्रो कंपनीत झालेल्या घोटाळ्यामुळे त्यांचे नुकसान झाले आणि त्यातून आलेल्या नैराश्‍यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

हे पण वाचा -  तिच्या हाती सोळा जनावरांची दावी

याबाबत अधिक माहीती अशी, प्रमोद यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या (जि. सांगली) रयत ऍग्रोकडे अडीच लाख रुपये भरले होते. शेड आणि अन्य खर्च यासाठी त्यांनी अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत ऍग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी नैराश्‍यातून शनिवारी (ता. 18) विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज(मंगळवार) सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कडकनाथ घोटाळ्यात झालेल्या फसवणूकीचा प्रमोद जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. यामुळे रयत ऍग्रो कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

हे पण वाचा - ...त्यामुळे शेतकऱ्यांवर आली रस्त्यावर फुले फेकण्याची वेळ

दरम्यान, या प्रकरणी रयत ऍग्रो कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रमोद यांच्या नातेवाईतांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer suicide at kolhapur panahala because hi Los in kadaknath scam