पीककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अनिल गाभूड
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

विहामांडवा : विहामांडवा (ता. पैठाण) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पिककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी (ता. 4) सकाळी दहा वाजता ही घटना घडली. मधुकर सुदाम आहेर (वय 47) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. या घटनेनंतर या शेतकऱ्यास तात्काळ विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, असुन मधुकर आहेर यांची प्रकृती गंभीर  आहे.

बॅंकेतील अधिकाऱ्यांनी आहेर यांना जातिवाचक बोलून अपमानित केले आणि पिक कर्ज ही न दिल्याने आहेर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Web Title: farmer try to suicide for rejecting crop loan