पुरामुळे झालेले नुकसान भरून कसे काढायचे, या विचाराने शेतकरी आजही चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.
पुनवत : शिराळा तालुक्यात जुलै-२०२४ ला पावसाळ्यात झालेल्या पुराच्या नुकसानीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना (Farmers) मिळालेले नाहीत. या संदर्भात संबंधित विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘केवायसी’ (KYC) करण्याचे आवाहन केले होते. त्याने त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी ही ‘केवायसी’ पूर्ण केली. मात्र खात्यावर नुकसानीचे पैसे पाच महिने झाले, तरी अनुदान मिळणार कधी? तालुक्यातील ‘वारणा’काठच्या पूरबाधित शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.