
Maharashtra Agriculture Schemes : रोजगार हमी योजनेतून डाळिंबाला हेक्टरी अडीच लाख तर पांडुरंग फुंडकर योजनेतून डाळिंबाला हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये मिळतात. गत वर्षभरापासून बंद असलेले पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेचे पोर्टल अखेर राज्य शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे पाच एकरावरील सधन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या अनुदानाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.