टेंभूचे आवर्तन सुरू न केल्यास कडेगावचे शेतकरी करणार आंदोलन 

संतोष कणसे
Saturday, 26 December 2020

रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तात्काळ सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्‍यातील टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्‍यात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

कडेगाव : रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तात्काळ सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्‍यातील टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्‍यात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

त्यामुळे तालुक्‍यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली होती. परंतु आता रब्बी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात विहिरी व कुपनलिकांतून उपसा होत आहे. त्यामुळे पुन्हा विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. परिणामी आता पिकांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. 

तर आता रब्बी हंगाम चांगलाच बहरला असून तालुक्‍यात 11 हजार 912 हेक्‍टर इतके सरासरी क्षेत्र आहे. तर उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे रब्बी व ऊस यासह अन्य पिकांना आता पाण्याची आवश्‍यकता आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा रब्बी हंगामासाठी टेंभु योजनेचे आवर्तन तत्काळ सुरु करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे. अन्यथा पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही टेंभुच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

टेंभू योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरु करण्याची कार्यवाही सुरु असून पुढील आठवड्यात आवर्तन सुरु होईल.परंतु शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लेखी मागणी करावी.तसे केल्यास मागणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करणे सोपे होईल. 
- नरेंद्र घार्गे, सहायक कार्यकारी अभियंता, टेंभू योजना

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers of Kadegaon will agitate if the cycle of tembhu is not started