लेंगरे परिसरातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत 

Farmers in Langare area are waiting for help
Farmers in Langare area are waiting for help
Updated on

लेंगरे : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेती आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्या नाल्यांना आल्याने अनेक गावांमधील रस्ते खचले आहेत. पूल वाहून गेले आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे खरीपातील कडधान्ये फळे, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लेंगरे परिसरात अंदाजे एक हजार एकर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. 

आठवड्यात लेंगरे भागात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात सलग दोन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बरोबरच पंचक्रोशीतील अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले तर काही ठिकाणी ओढा पात्रातील पाणी पात्राबाहेर गेल्याने शेती रस्ते खचले आहेत. 11 ते 15 ऑक्‍टोबर या काळात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टी झालेल्या त्या मुसळधार पावसामुळे देविखिंडी,लेंगरेतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान सांगोला (ता.खानापूर) येथील अतिवृष्टी झाल्याने येथील वाड्यावरील पूल वाहून गेला आहे.यामुळे येथे वास्तव्यास असणार्या ग्रामस्थांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. सांगोले गावातील गावातील ग्रामस्थांना या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शेतीत जाण्यास जवळपास चार किलोमीटरचे अंतर पार करावे लागत आहे.यामुळे ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने होत आहे. 

अतिवृष्टीमुळे शेती, इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेल्या रस्ते, पुल यांची माहिती घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शेतीच्या कडधान्य पिकांचे झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांची समिती गठन केली आहे. 
- ऋषीकेत शेळके, तहसीलदार 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com