शेतकऱ्यांनी लॉकडाऊनने घेतला हा धडा 

The farmers learned this lesson through lockdown
The farmers learned this lesson through lockdown
Updated on: 

पलूस (जि.  सांगली) ः "कोरोना' चा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका द्राक्षे, आंबा, केळी, भाजीपाला, फुले उत्पादकांना बसला. लॉकडाऊनमुळे स्वतः पिकवलेला शेतमाल विक्रीची व्यवस्था येथून पुढे शेतकऱ्याना स्वतःच करावी लागणार आहे. हा धडाही शेतकऱ्यांना यानिमित्ताने घेतला आहे. 

लॉकडाऊन अगोदर द्राक्षे, भाजीपाला व इतर शेतमालाला बरा भाव मिळत असे. मात्र, कोणाच्या ध्यानीमनी नसताना, "कोरोना' ची एंट्री झाली. त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू केले. इथून पुढेच शेतमालाचे भाव कोसळले. यात द्राक्षबागायतदारांची तर पाचावधारण बसली. व्यापारी, दलाल, फिरकेना. आले त्यांनी कवडीमोल दराने द्राक्षे खरेदी केले. कोट्यवधीचा फटका द्राक्षबागायतदारांना बसला. नाईलाजाने काहींनी बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचे उपद्‌व्याप सुरू आहेत. 

द्राक्षासारखीच अवस्था भाजीपाल्याची झाली. शेवटी, शेवटी तर, वांगी, कोबी, ढबु मिरची, फुलांच्या शेतात जनावरे सोडून द्यायची वेळ आली. काहींनी पिकांवर नांगर फिरवला. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली. तीच अवस्था केळी, आंबा, कलिंगड या फळांची. 

आता शेतमाला अपेक्षित दर मिळत नाही. अशी स्थिती आताची नाही. प्रश्न नेहमीचा आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठा धडा मिळाला. हे मात्र खरे. लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाला बाजार बंद झाले. शेतमाल वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली. शहरी व इतरही भागात भाजीपाला घरपोच मिळू लागला. मात्र, शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने खरेदी केलेली द्राक्षे, आंबे, भाजीपाल्याचे दर काही कमी नव्हते. तीन - चारपट दराने ग्राहकांना फळे व भाजीपाला विकला जात होता व आजही विकला जातोय. 

लॉकडाऊन संकटात काही शेतकरी, त्यांची मुले पुढे आली. त्यांनी स्वतः द्राक्षे, कलिंगड, केळी व भाजीपाला शहरी भागात नेऊन विकण्याचे धाडस केले. त्यांना तीथं चांगला भाव मिळाला. "इथून पुढेही आमचा शेतमाल स्वतः नेऊन विकणार' असा संकल्प केला आहे. ग्राहकही ताजा भाजीपाला मिळतोय, चार पैसै स्वस्त आणि शेतकरी डायरेक्‍ट भाजीपाला पोहोच करतोय म्हणून समाधानी आहे. असे हे युवक सांगताहेत. 

लॉकडाऊनमुळे विक्रीची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली पाहिजे

लॉकडाऊनमुळे द्राक्षाला फटका बसला. कोट्यवधींचे नुकसान झाले. यापूर्वीसुद्धा व्यापारी, दलाल कमी दराने द्राक्ष घेऊन लूट करीत होते. लॉकडाऊनमुळे द्राक्ष व भाजीपाला विक्रीची स्वतंत्र व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली पाहिजे हा विचार बळावला. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

- प्रकाश कचरे, द्राक्षबागायतदार, पलूस 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com