पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

भारत कदम
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा काढून शनिवारी (ता. 17) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा काढून शनिवारी (ता. 17) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेत सांगोला ( सोलापूर) तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी सरकारने मंजुर केले आहे. परंतू आतापर्यत हे पाणी सांगोला तालुक्याला मिळाले नाही. हे हक्काचे पाणी मिळावे, म्हणून शेतकऱ्यानी अनेक आंदोलने केली आहेत. 26 आक्टोबरला माण नदीत पाणी सोडून चिणकेपासून मेथवडे पर्यतचे बंधारे पाण्याने भरून मिळावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.

14 गावच्या पाणी संघर्ष समितीच्या सदस्याना तहसिल कार्यालयात बोलावून प्रांताधिकारी, तहसिलदार व टेंभूचे कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना 16 नोव्हेबरपासून पाणी सोड्न बंधारे भरून देण्याचे लेखी पत्र दिले होते. पण 16 नोव्हेंबरला लेखी पत्रानुसार पाणी न सोडल्याने 14 गावातील शेतकऱ्यानी 17 नोव्हेबरी सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौकातून जनावरासह मोर्चा काढला. माण नदीमध्ये पाणी येईपर्यत तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये म्हैस, गायबैल यांच्यासह शेतकरी बैलगाडया घेऊन आले आहेत. तसेच हे आंदोलन पाणी येईपर्यत सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यानी ठामपणे ठरवले आहे.

Web Title: Farmers protest in sangola for water