Sangli Accident : ट्रक व दुचाकीमधील अपघातात एकजण जागीच ठार; पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

गुराप्पा सिद्धाप्पा म्हेत्रे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही.
Police inspect the site where a truck collided with a bike, killing the rider instantly on Pandharpur-Vijaypur highway.
Police inspect the site where a truck collided with a bike, killing the rider instantly on Pandharpur-Vijaypur highway.Sakal
Updated on

उमदी : पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. गुराप्पा सिद्धाप्पा म्हेत्रे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. आज दुपारी एकच्या सुमारास रस्त्याकडेला सिमेंट पोती भरलेला मोठा ट्रक उभा होता. उभ्या ट्रकवर मागून दुचाकीवरून आलेल्या गुराप्पा मैत्री यांनी जोराची धडक दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com