
मिरज : रेल्वे धडकेच्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात एक घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवरच घडली, दुसऱ्या घटनेत एकाचा कृष्णाघाट रेल्वे गेट येथे धडकेत मृत्यू झाला. रामा दादू तिरताई (वय ५४, रेणुका कॉलनी, नदीवेस, शास्त्रीचौक, मिरज) आणि शाम शंकर सरवदे (७७, ईश्वर वठार, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.