मुलाने केला वडिलांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

खून प्रकरणात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पोलिसांनी रविवारी 19 जानेवारीला खुनात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक एमएच 12 इएक्‍स 7778) जप्त केली होती. ही गाडी बार्शीतील सोनू पवार याच्या नावे असल्याचे उघड झाले. या गाडीतील रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.

कुर्डू (सोलापूर): लऊळ (ता. माढा) येथील कृषी सहायक अंगद घुगे खूनप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी मृत घुगे यांचा मुलगा विशाल अंगद घुगे (वय 20) यास सोमवारी मध्यरात्री उस्मानाबाद येथून अटक केली. विशाल हा बार्शीतील एका पॉलिटेक्‍निकचा विद्यार्थी असल्याचे समजते. संशयित आरोपीला माढा येथील न्यायालयासमोर उभे केले असता 25 जानेवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

खून प्रकरणात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पोलिसांनी रविवारी 19 जानेवारीला खुनात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक एमएच 12 इएक्‍स 7778) जप्त केली होती. ही गाडी बार्शीतील सोनू पवार याच्या नावे असल्याचे उघड झाले. या गाडीतील रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मृत घुगे यांचा मुलगा विशाल हा उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला खुनातील संशयित आरोपी म्हणून मध्यरात्री अटक केली. गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यास माढा न्यायाधीश एस. एस. सय्यद यांच्यासमोर हजर केले असता 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 
या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, प्रवीण दराडे, सहदेव जगदाळे, बाबासो घाडगे, सागर सुरवसे, प्रशांत किरवे, अश्‍पाक शेख, दत्ता सोमवाड, भीमराव देवकर, हनुमंत वाघमारे या पथकाने ही कामगिरी केली. यात सरकारतर्फे ऍड. विशाल सक्री व आरोपीतर्फे ऍड. हरिश्‍चंद्र कांबळे यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father murdered by Child