पुनवत : शिराळा तालुक्यात मे महिन्यापासून सलग पाच महिने पाऊस झाल्याने चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. महिन्यापासून आजअखेर बोचरी थंडी वाढत आहे. परिणामी आंब्याची झाडे मोहोरांनी बहरायला लागली आहेत. .रब्बीतील पिकांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. आंबा बागायतदारांत समाधानकारक वातावरण असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यात शिराळा, रिळे, कापरी, खेड, रेड, बिऊरसह परिसरांत जवळपास १०० एकरांत आंब्याच्या बागा आहेत. .Jalgaon Agriculture : अतिवृष्टीनंतर आता अळीचे संकट: तूर पीक हातातून जाण्याची भीती, कृषी विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या.रिळे (ता. शिराळा) येथील खंडोबा माळ येथील भवाने वस्ती परिसरात आंबा बागायतदार अधिक आहे. या परिसरात जवळपास २० ते २५ एकरांत आंब्यांच्या बागा आहेत. गतवर्षीपेक्षा झाडांना सरसकट मोहोर आलेला पाहायला मिळत आहे; तर उर्वरीत झाडांना अजूनही येत आहे..पोषक वातावरणामुळे व समाधानकारक मोहोर यामुळे आंबा बागायतदारांच्या पदरात यावर्षी काहीतरी पडेल, या अपेक्षेमुळे शेतकरी समाधानी आहे. यंदा सुरुवातीपासून आंबा पिकाला वातावरण चांगले आहे. काही पदरात पडेल ही अपेक्षा आहे. .Sangli Farmer : अतिवृष्टी, करपा व मावा रोगाचा फटका; शिराळा तालुक्यात ऊस उत्पादनात ३० टक्के घट.वातावरणातील बदल, अवकाळी या ना कारणाने प्रत्येकवर्षी नुकसान व मोठी वित्तहानी होते. बहुतांश आंबा बागायतदारांनी बागांचा विमा उतरवला आहे. काही शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला नाही. त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने विमा उतरवावा. प्रशासन व कृषी विभागाने भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.- सुरेश गायकवाड, आंबा बागायतदार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.