कोरोनाची धास्ती : जिल्ह्यात दस्तनोंदणीला 30 टक्के प्रतिसाद 

dast nondani.jpg
dast nondani.jpg
Updated on: 

सांगली- कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सांगली जिल्ह्यातील महापालिका हद्दीसह जिल्ह्यातील दस्त नोंदणीची 13 कार्यालय सुरु झालेली आहेत. महापालिका हद्दीत 10 तर महापालिका हद्दीत तीन खरेदी विक्रीची कार्यालय आहेत. 


राज्यासह जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यांनंतर दस्त नोंदणीला सुरुवात झाली. त्यातही ग्रामीण भागातील दहा कार्यालयात लवकर आणि महापालिका हद्दीत विलंबाने दस्तनोंदणीला सुरु झाली. जिल्ह्यातील 13 दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री तसेच तारणगहाण असे व्यवहार सुरु झाले आहेत. सरासरीच्या तुलनेत कोरोनामुळे केवळ 25 ते 30 टक्केच दस्त नोंदणी केली जात आहे. निमित्ताने गेली दीड महिना थांबलेले व्यवहार सुरळीत सुरु झालेले आहे. मुद्रांक विक्रेत्यांसह करार करुन देणाऱ्या परवानाधारक व पक्षकारांची लगबग सुरू झालेली आहे. 

राज्यभरात ऑनलाईन दस्तनोंदणीला मान्यता दिली होती. सांगलीत अशी व्यवस्था नसल्याने ऑफलाईन पद्धतीने दस्त स्वीकारले जाणार होते. लॉकडाउनला सुरवात झाल्यापासून कार्यालये बंद होती. दुय्यम निबंधकांच्या हाती ग्लोज, मास्क तसेच पक्षकांच्या तोंडाला मास्क, कर्मचाऱ्यांना अशाच अटी घालून कामास सुरवात झाली. एकावेळी एका पक्षकारास नोंदणीसाठी परवानगी दिली जात होती. प्रत्येकाच्या हाती सॅनिटायझर लावूनच नोंदणी केली जाते. संबंधित पक्षकाराचे छायाचित्र काढण्यापुरते तोंडावरील मास्क काढण्यास मुभा होती. नंतर डिव्हाईसवर सॅनिटायझर शिपडून ते निर्जंतुकीकरण केले जात होते. खरेदी-विक्री तसेच तारणगहाण दस्तांची नोंद केली जात आहे. हक्कसोडपत्र, वाटणीपत्राच्या दस्तांना अद्याप शासनाने परनानगी दिलेली नाही. 
मुद्रांक शुल्कापोटी जिल्ह्यातून वर्षाला सुमारे दीडशे कोटींचा महसूल शासनाला जमा होतो. सहा टक्के मुद्रांक शुल्क. नोंदणी शुल्क, एलबीटी या प्रमाणे आकारणी होते. मुद्रांक शुल्कापोटी जमा होणारा महसूल गेल्या दीड महिन्यापासून शंभर टक्के बंद होता. कामकाजास आजपासून प्रारंभ झाल्याने किमान महसुल सरकारच्या तिजोरीत जमा होत झाली. 


" सांगली जिल्ह्यातील 13 दस्त नोंदणी कार्यालय सुरु झालेली आहेत. या ठिकाणी पहिल्यापेक्षा 25 ते 30 टक्के प्रतिसाद मिळतो आहे. लोकांची गैरसोय टळली आहे. शिस्तीचे सर्व नियम पाळून व्यवहार सुरु आहेत.' 
एस. एन. दुतोंडे, मुद्रांक उपजिल्हाधिकारी, सांगली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com