पोलिसाचा मृत्यूने कामेरीत धास्ती...एक पोलिस कर्मचारीही बाधीत

दिलीप क्षीरसागर 
Friday, 17 July 2020

कामेरी (सांगली) - वाळवा तालुक्‍यातील कामेरी येथील 57 वर्षाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने गुरुवारी रात्री मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलात ते कार्यरत होते. सुटीला ते गावी आले होते. येथील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण आहे. मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला नाही. तातडीची उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी या दोन कुटुंबातील व्यक्तींना व शेजारील 19 लोकांना क्वारंटाईन केले आहे. 

राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या वसाहतीत मृत्य पोलीस कर्मचाऱ्याचे घर आहे. ते 11 जुलै रोजी भिवंडीहून आपल्या कुटुंबासह गावी आले होते. त्यांना सर्दी, खोकला, ताप, घशातील दुखणे होते. त्यामुळे त्यांना मिरज येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत रात्री उशिरा जास्त बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

कामेरी -शिवपुरी रस्त्यावरील बच्चे मळा येथील 37 वर्षीय पोलीस कोरोना बाधित आढळला आहे. भुसावळ मुंबईहून ते 10 जुलै रोजी गावी आले होते. त्यांचाही स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले. या दोन्ही कुटुंबाचा व परिसराचा सर्वे करून 19 लोकांना कोरंनटाईन केले. गावात यापूर्वी 94 वर्षाच्या आजीबाई कोरोनातून सुखरुप बचावल्या होत्या. पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी गावाला भेट दिली. ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, सरपंच स्वप्नाली जाधव यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. 

लग्नाबाबत विचारपूस 

कामेरीतील मृत पोलिस कर्मचारी एका लग्नसमारंभासाठी गावी आले होते. ते त्या लग्न समारंभात हजर होते का, याविषयी वैद्यकीय पथकाने कुटुंबियांकडे चौकशी केली. त्यांनी तब्बेत बिघडल्याने ते लग्नाला आले नव्हते, असे सांगितले आहे. त्यामुळे लग्न समारंभात हजर असणाऱ्यांनी निश्‍वास टाकला, मात्र लग्नघरातील एक महत्वाचा सदस्य कोरोनाने दगावल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of death of a policeman in Kameri