‘फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे’ धावणार मंगळवारपासुन ; असे आहे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

विविध राज्यांना जोडणाऱ्या ११ पेअर म्हणजेच एकूण २२ रेल्वे धावणार आहेत.

बेळगाव : नैऋत्य रेल्वेतर्फे दुर्गापूजा आणि छटपूजेच्या निमित्ताने २० ऑक्‍टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे’ सोडण्यात येणार आहेत. विविध राज्यांना जोडणाऱ्या ११ पेअर म्हणजेच एकूण २२ रेल्वे धावणार आहेत.

गांधीधाम-केएसआर बंगळूर-गांधीधाम साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल गांधीधामहून २७ ऑक्‍टोबरपासून १ डिसेंबरपर्यंत दर मंगळवारी धावेल. तर बंगळूररहून २४ ऑक्‍टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी ही रेल्वे धावणार आहे. हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी डेली एक्‍सप्रेस स्पेशल हुबळीहून २२ ऑक्‍टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. यशवंतपूर-कोरबा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्‍सप्रेस यशवंतपूरहून २३ ऑक्‍टोबरपासून २७ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे.

हेही वाचा - गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी -

कोरबाहून २५ ऑक्‍टोबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी धावेल. म्हैसूर-वाराणसी-म्हैसूर द्वि-साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल म्हैसूरहून २० ऑक्‍टोंबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार व गुरुवारी धावेल. वाराणसीहून २२ ऑक्‍टोंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे.
अहमदाबाद-यशवंतपूर-अहमदाबाद साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल दर मंगळवारी अहमदाबादहून २७ ऑक्‍टोबरपासून १ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. यशवंतपूरहून दर रविवारी ती धावेल.

हैसूर-धारवाड-म्हैसूर डेली एक्‍सप्रेस स्पेशलला म्हैसूरहून २१ ऑक्‍टोबरपासून सुरुवात होऊन १ डिसेंबरपर्यंत धावेल. धारवाडहून २० ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
वास्को-द-गामा पटना-वास्को-द-गामा साप्ताहिक सुपरफास्ट एक्‍सप्रेस विशेष रेल्वे वास्को-द-गामा येथून दर बुधवारी २१ ऑक्‍टोंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत धावेल. दर शनिवारी पटना येथून २४ ऑक्‍टोंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत धावेल. केएसआर बेंगळूर-जोधपूर-केएसआर बेंगळूर द्वि- साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल दर गुरुवारी आणि शनिवारी बंगळूरहून २४ ऑक्‍टोंबरपासून ३ डिसेंबरपासून धावेल.

दरम्यान जोधपूरहून २१ ऑक्‍टोंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी आणि बुधवारी धावणार आहे. हुबळी-सिकंदराबाद-हुबळी डेली एक्‍सप्रेस स्पेशल हुबळीहून २० ऑक्‍टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत तर सिकंदराबादहून २१ ऑक्‍टोबर ते १ डिसेंबरपर्यंत धावेल. अजमेर-म्हैसूर-अजमेर द्वि-साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल अजमेर येथून २३ ऑक्‍टोबरपासून २९ नोव्हेबरपर्यंत दर रविवारी व शुक्रवारी धावेल. तर म्हैसूरहून २६ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी धावणार आहे.

हेही वाचा - कृष्णेवरील कुडची पुलावर तिसऱ्यांदा पाणी ; आंतरराज्य वाहतूक पुन्हा बंद -

कोरोना नियमाचे पालन करा

हुबळी-वाराणसी-हुबळी साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल दर शुक्रवारी हूबळीहून २३ ऑक्‍टोबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. वाराणसीहून दर रविवारी २५ ऑक्‍टोबरपासून २९ नोव्हेबरपर्यंत धावणार आहे. प्रवासावेळी प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: festival special 22 trains start from tuesday 23rd october to 27th october the timetable declared in belgaum