श्रीनय हा येथील इंग्रजी माध्यम शाळेत (English Medium School) पाचवीत शिकत आहे. प्रादेशिक भाषांबद्दल आदर ठेवून तो मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील मुलांची इंग्रजीची भीती दूर करत आहे.
निपाणी : प्रादेशिक भाषेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजीची (English) भीती असते. त्यामुळे या विषयात त्यांची प्रगती होत नसल्याची बाब लक्षात घेऊन येथील ११ वर्षांचा श्रीनय बाडकर हा ‘अक्षरबोट’द्वारे त्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश रिडींग स्कील आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे.