महापुरातील नुकसानीसाठी पन्नास कोटींचा निधी...मंत्री विजय वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

सांगली- जिल्ह्यातील गेल्या महापुरात झालेल्या छोटे व्यापारी, शेती नुकसान, व घरांच्या पडझडसाठी तसेच यंदाच्या महापूर नियोजनासाठी 50 कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन कार्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे ते पत्रकार परिषदेत दिली. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरहो मदत पुनर्वसन तसेच आरोग्य विभागाच्या निधीला कात्री लावलेली नाही. महसूल जमा नसल्यामुळे राज्यावर आर्थिक संकट आहे. या काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला एक रुपयाचीही मदत केलेली नाही, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी बोलताना केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावा मंत्री वडेट्टीवार यांनी घेतला. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ×. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी प्रमुख उपस्थित होते. 
मंत्री वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या महापुरातील मदतीवर पासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची राज्य सरकारने काळजी घेतलेली आहे. गेल्या महापुरातील सांगली जिल्ह्यातील 1640 छोटे व्यापारी यांचे 5.25 कोटी रुपये, शेतीची मदत आणि घरांची पडझड झालेले मदती पोटी 50 कोटी रुपये निधी तातडीने दिला जाईल. यंदाच्या महापूर देण्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेकडून 22 बोटी तर राज्य सरकार 20 बोटी जुलै अखेर उपलब्ध करून देईल. सातारा जिल्ह्यासाठी आठ बोटी तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही 25 बोटी तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सांगली जिल्ह्याला आणखी एक एनडिआरएफची टीम ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्याला यापूर्वीच एक टीम दिली आहे. 

ते म्हणाले, महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या काठावरील 31 हजार 377 कुटुंब हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तर याच गावातील 63 हजार 293 जनावर ची हलवण्याची तयार केली आहे. गेल्या वर्षीच्या चाराटंचाई साठी पाच कोटी आणि अवकाळी पावसाचे मदती कोटीचे दोन कोटी 40 लाख रुपये मदतही देऊ. 

वडनेर समितीवर अभ्यास करतोय-
मंत्री वडृडेटीवार म्हणाले, वडनेर समितीच्या अहवालाचा मी सध्या अभ्यास करत असून त्या समितीवर जादा बोलण्यापेक्षा अलमट्टीचा विसर्ग वाढवला तर नक्कीच पूर येणार नाही. असे मला वाटते. पण आज तो माझ्यादृष्टीने चर्चेचा विषय नाही. 

निधीची टंचाई 
राज्यात निधीची कमतरता असली तरी 25.15 मधून सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. यावर मंत्री वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की गेल्या सरकारच्या काळात आम्हाला या निधीतून एक रुपया मिळाला नव्हता. आम्ही आता सत्तेत असल्यामुळे काही सत्ताधारी आमदारांना या निधीसाठी झुकते माप दिले आहे . त्यासाठीची तरतूद मात्र गेल्या सरकारनेच केलेली आहे. 

नवीन बोट प्रस्तावित 
ब्रह्मनाळ येथे गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही जुनीच बोट वापरली जाते आहे. यावर मंत्री वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी जिल्हाधिकारी यांना उत्तर देण्यास सांगितले. यावर जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की , येथे नवीन बोट प्रस्तावित केलेली आहे. रस्ता दुरुस्ती बाबत मंत्री कदम म्हणाले, काम मंजुर असुन ते तातडीने सुरू करीत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty crore fund for flood damage. Minister Vijay Vadettiwar