जुनी धामणीत दोन गटात राडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जुनी धामणी (ता. मिरज) येथे मारहाणीचा जाब विचारल्याच कारणातून दोन गटात चाकू, दगड आणि काठीने मारमारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे.

सांगली ः येथील जुनी धामणी (ता. मिरज) येथे मारहाणीचा जाब विचारल्याच कारणातून दोन गटात चाकू, दगड आणि काठीने मारमारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांत याबाबत नोंद करण्यात आली आहे.

मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहन परशुराम सूर्यवंशी याने कार्तिकेश दीपक सूर्यवंशी (रा. जुनी धामणी), मनोज सरगर, अवधूत पाटील (दोघे रा. संजनगर, सांगली) व त्यांच्यासोबत असलेले 8 ते 10 लोकांविरुद्ध फिर्याद दिली आहे. कार्तिकेश दीपक सूर्यवंशी याने रोहन परशुराम सूर्यवंशी, प्रथमेश एकनाथ सूर्यवंशी (दोघे रा. जुनी धामणी), राहुल परशुराम सूर्यवंशी (रा. संजयनगर, सांगली) व इतर 4 यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रोहन सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीत, मारहाणीबाबत विचारणा करण्यासाठी सर्व संशयित जुनी धामणी येथील कार्तिकेश याच्या घरी गेले होते. यावेळी कार्तिकेश याने रोहन याच्या डोकीत दगडाने मारहाण केली. तर अवधूत पाटील याने त्याच्याकडील चाकूने रोहन याच्या हातावर वार केला. मनोज सरगर याने डोकीत दगडाने मारहाण केली. तर त्यांच्या सोबत आलेल्या 8 ते 10 जणांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची म्हटले आहे.

कार्तिकेश सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीत, तो घरी असताना रोहन, राहुल आणि प्रथमेश या तिघांसह सांगलीतील अन्य चार अनोळखी त्याच्या घरी आहे. यावेळी रोहन व राहुल या दोघांनी डोकीत दगडाने मारहाण केली. तर प्रथमेश याच्यासह अन्य चौघांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या चुलत्यांना देखील राहुल याने लाकडी दांडक्‍याने डोकीत मारहाण केल्याचे म्हटले आहे. 

मारामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between tow groups in old dhamani of Miraj taluka