मरगळ झटकून द्राक्ष हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात 

grape.jpg
grape.jpg


 

विष्णू मोहिते 
सांगली,  ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गेल्या वर्षी शेतकऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करुन आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरु झालेली आहे. नाशिकसह सांगली जिल्ह्यातील काही प्रयोगशिल शेतकऱ्यांनी जुलै अखेरीस बागांची छाटणी घेतली आहे. जिल्ह्यात सरसकट 10 सष्टेंबर ते ऑक्‍टोबर अखेरीस छाटण्याकडे कल आहे. कोरोना, हवामान, बाजारपेठ, निर्यात असे अनेक प्रश्‍न घेवून आर्थिक परस्थितीतही पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. 

राज्यात सांगली, नाशिक, कर्नाटकासह सोलापूर, अहमदनगर, पुणे, जालना जिल्ह्यात क्षेत्र मोठ्या संख्येने वाढते आहे. पैसे कमावून देणारे पीक म्हणून आता शिक्षिक शेतकरी, तरुण याकडे वळताहेत. ही जमेची बाजू आहे. यातील अनेक मोठे शेतकरी समजून-उमजून शेती करीत आहेत. मात्र लहान क्षेत्र असलेले शेतकरी न समजवून घेता, सल्लागार, डॉक्‍टर, दुकानदार यांच्या सूचनेनुसार शेती करताहेत. जस की कोरोनाच्या सध्याच्या काळात सोशल डिस्टसिंग, मास्कची दक्षता न घेता थेट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजून प्रत्यक्ष उपचार करुन स्वतःची तब्बेतीला रोग प्रतिकार शक्तीलाच जवळ करताहेत. जमिनीचा पोत सुधारण्यावर ताकद खर्च करण्यापेक्षा रोगावर इलाजाचा शेतकरी शिकार बनतोय. 

द्राक्ष हंगामाची रणनिती ठरवताना गतवर्षीचा परतीचा पाऊस, मार्चपासूनची कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची उलथापालथीने बागायतदार पुरता भांबावला आहे. यंदा हंगाम कसा असेल? कोरोना संकट किती दिवस चालेल? हवामान साथ देईल का ? द्राक्ष निर्यात होतील का ? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. द्राक्ष निर्यात करणाऱ्या विविध कंपन्यांशी संवादातून सर्वसाधारण डिसेंबर सुरुवातीपासून मालाची आवश्‍यकता स्पष्ट होते.

ऑक्‍टोबर नंतर पावसाची शक्‍यता नसल्याचे हवामान विभागाचे मत आहे. या सर्व बाबींचा विचार करता फळ छाटणी हंगामास हरकत नाही, याची चर्चा सुरु झाली आहे. 
फळ छाटणी करताना मध्यतरी आणि सध्या पडलेल्या पावसामुळे बऱ्याच बागांची पानगळ, खरड छाटणीला 150 दिवस वय झालेल्यांसाठी काही अडचण नाही. मात्र अपूर्ण दिवसात छाटणीची घाई करू नये. पानांची संख्या कमी झालेली असल्यास अद्यापही पाने वाढवून काडी पक्वतेकडे लक्ष द्यावे लागेल. 

कोरोना महामारीत कामगार मिळतील की नाही, याचीही चर्चा आहे. सध्या तरी कामगारांचा तुटवडा भासेल, असे चित्र नाही. लहान बागायतदारांनी कामगारांबरोबर काम केल्यास खर्चात बचत होईल. चालू वर्षाची द्राक्ष कामे आपल्याला सामाजिक अंतर ठेवूनच करावी लागणार आहेत. द्राक्षबाग पोषण व संरक्षणासाठी खते वापरताना संशोधन केंद्राच्या शिफारसी महत्वाच्या आहेत. संरक्षणासाठी जैविक बुरशीनाशके व कीटकनाशक फवारणी, आळवणी अपेक्षीत आहेत. संजीवक मर्यादित वापरुन चांगली द्राक्षे तयार करावी लागतील. निर्यातीसाठी प्रमाणित केलेल्या रसायनांची यादी प्रत्येक देशाची वेगवेगळी असते. त्यामुळे फवारणी वेळापत्रक अभ्यासपूर्ण करावेत लागेल. द्राक्षाला दर काय मिळेल हे आपल्या हातात नसल्याने उत्पादन खर्च मर्यादितच करावा लागेल. 
 
पॉईटर... 
 जिल्ह्यातील द्राक्षाचे क्षेत्र 1.20 लाख एकर 
 कोरोनातही 32 हजार टन फळांची निर्यात 
 द्राक्षाप्रमाणे यंदापासून बेदाण्याचीही ऑनलाईन नोंदणी 
 संकटातही शेतकऱ्यांना एक संधी 
 औषध टंचाईची शेतकऱ्यांना वाटतेय भिती 
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com