राज्य सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान प्रतिलिटर ४० रुपये दर द्यावा.
सांगली राज्य शासनाने गायीच्या दुधाला (Milk Price) प्रतिलिटरला सात रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतरही उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. दिवाळी व त्यानंतर थंडीच्या पोषक वातावरणात गायीचे दूध उत्पादन वाढले. मात्र उत्पन्न कमी झाले आहे. दूध संघांनी खरेदी दरात केलेली कपातच शेतकऱ्यांच्या (Farmers) मुळावर आली आहे. त्यांचा थेट परिणाम उत्पन्नावर झाला आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होत आहे.