आगीत चार एकर ऊस खाक; नेर्लेत दोन घटना

Fire four acres of sugarcane field; Two incidents in Nerle
Fire four acres of sugarcane field; Two incidents in Nerle

नेर्ले (जि. सांगली) : येथील कापूसखेड-नेर्ले रस्त्यालगतच्या आटल्या व घाणदेवी परिसरातील लागलेला उसाच्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन्हीकडे वेगवेगळ्या दिशेला अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकरी हैराण झाले होते. आगीत कूपनलिकेची मोटर, पाईप, वायर, फ्यूज पेटी व ठिबक पाईप जळून मोठे नुकसान झाले. 

आज सकाळी 11 च्या सुमारास आटल्या परिसरात ऊसतोड सुरू असताना अचानक उभ्या उसाला आग लागली. वाऱ्यामुळे आग जास्त वाढली. शेतकऱ्यांची पळापळ झाली. शेतकऱ्यांना अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात यश आले. या घटनेनंतर काहीवेळाने पूर्वेच्या बाजूला असलेल्या घाणदेवी परिसरातील उभा ऊस अचानकपणे पेटू लागला. धुराचे लोट आकाशाला भिडत होते.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली, परंतु बाजूचा ऊस तुटल्यामुळे व वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. जवळपास दोन एकर ऊस जळून खाक झाला. यात ठिबक सिंचनची पाईपलाईन व बोअरिंगचे साहित्यही खाक झाले. भर दुपारी पेटलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शेतकरी आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची अग्निशमनदलाची गाडीही हजर झाली. परंतु रस्ता नसल्यामुळे गाडी परत गेली. कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील यांनी शेतकऱ्यांना सूचना देऊन ऊस नेण्यासाठी प्रयत्न केले.

यात हणमंत रामचंद्र माने, मधुकर ऊर्फ गौरीहार मारुती माने, आनंदा केरू पाटील (तांबवे कर) कमलेश मोरे, दीपक माने या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दीपक ऊर्फ कृष्ण माने यांचे मोटर, पाईप, ठिबक जळाले.

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com