
कुपवाड : औद्योगिक वसाहतीतील एका चॉकलेट कारखान्यासंबंधित पेपर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न पहाटेपर्यंत सुरू होते. सकाळपर्यंत जवानांना यश आले.