दुर्दैव! हातातोंडाला आलेल्या पीकाची डोळ्यासमोर झाली राख ; पंधरा एकरातला ऊस जळुन खाक

fire to sugar can farm in belgaum 15 ekar sugarcane damage
fire to sugar can farm in belgaum 15 ekar sugarcane damage

बेडकिहाळ : नेज (ता. चिक्कोडी) येथील काडसिद्धेश्वर मंदिर परिसरातील १४ एकर ३२ गुंठे क्षेत्रातील उसाच्या फडाला आग लागली. त्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग तीन तास धुमसत होती. 

याबाबत अधिक माहिती अशी, आगीत श्रीकांत अण्णासाहेब नसलापुरे (रा. शमनेवाडी) यांच्या सर्व्हे नंबर १८७ /१,२ मधील ७ एकरातील ऊस, सर्व पाईपलाईन  साहित्य,  ठिबक  सिंचन व केबल जळून खाक झाल्या. कल्लाप्पा मनगेनी गावडे  (रा. शमनेवाडी) यांच्या सर्व्हे नंबर १८६/१२ मधील १ एकर २० गुंठे क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन,  सूर्याप्पा राघू गावडे  (रा. शमनेवाडी) यांच्या सर्व्हे नंबर १८६/१२ मधील १ एकर  २० गुंठे ऊस, ठिबक सिंचन, मोटार पंपसेट व केबलही जळाल्या. 

मालाश्री सदाशिव मलागी (रा. नेज)  यांच्या सर्व्हे नंबर १८६ /१२ मधील ३ एकर ३२ गुंठे ऊस, ठिबक सिंचन व प्रवीण बाबासाहेब चौगुले (रा. नेज) यांच्या सर्व्हे नंबर २०४/५ मधील १ एकर ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाल्याने या सर्व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. उसाच्या फडांना कशी लागली  हे  मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

यामध्ये बेडकिहाळ साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणारी बैलगाडी देखील जळाली आहे. पण सुदैवाने कोणतीच जीवित हानी झालेली नाही. या वेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी त्वरित घटनेची माहिती सदलगा व चिक्कोडी येथील अग्नीशामक दलाला माहिती दिली. दुपारी १ नंतर अग्नीशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

नुकसान पाहून हळहळ व्यक्त

घटनेची माहिती समजताच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आग विझविण्यासाठी अनेकांनी बापू प्रयत्नांची पराकाष्टा केली. यावेळी झालेले नुकसान पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com