

Solapur crime
sakal
सोलापूर : हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोडवरील ॲपेक्स स्टील ॲंड हॉर्डवेअर कंपनीच्या मालकाच्या कारवर गोळीबार करून कारमधील रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला. यात सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वातील पथकाने संशयितांना जेरबंद केले. यातील फरार मुख्य सूत्रधार व त्याचा दुसरा साथीदार, असे एकूण आठजण जेरबंद करण्यात आले आहेत.
सोलापूर : सोलापूर- हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोडवरील ॲपेक्स स्टील ॲंड हॉर्डवेअर कंपनीच्या मालकाच्या कारवर गोळीबार करून कारमधील रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला. यात सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वातील पथकाने संशयितांना जेरबंद केले. यातील फरार मुख्य सूत्रधार व त्याचा दुसरा साथीदार, असे एकूण आठजण जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांनी आठ दिवस आधी प्लॅन केला, साथीदार जमविले आणि यासाठी बेकायदा पिस्तूल विकत घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.
ॲपेक्स स्टील कंपनीचा वाहनचालक एजाज नबीलाल तांबोळी हा दररोज कंपनीची दिवसभरातील कमाई मालकाच्या घरी नेत होता. १५ जुलैला रात्रीच्या वेळी कंपनीतून बाहेर पडून काही अंतरावर गेल्यावर तिघांनी एजाजची कार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगावधान साधून एजाजने कार आहे तशी रिव्हर्स कंपनीत पळविली. त्यावेळी एकाने कारच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. प्लॅन फसल्यानंतर संशयित फरार झाले. एजाजच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कदम यांच्या पथकाने २४ तासांत चौघांना पकडले. त्यानंतर आणखी चौघांची नावे निष्पन्न झाली. सध्या श्रीकांत दत्तात्रय गाडेकर (रा. उळेवाडी, ता. दक्षिण सोलापूर), अंकुश दशरथ गायकवाड, महादेव गुरुनाथ विभूते, सुफियान शब्बीर मुल्ला, निखिल मल्लिनाथ पटणे ऊर्फ गोट्या, साजीद सलाम पटेल (सर्वजण रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) हे न्यायालयीन कोठडीत आहेत. नव्याने अटक केलेल्या दोघांमध्ये एक मुख्य सूत्रधार असून त्यांना न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पाेलिस कोठडी ठोठावली आहे.
दिवसा नातेवाइकांकडे यायचा अन् रात्री बोरामणीच्या जंगलात झोपायचा
गुन्ह्यातील मूळ सूत्रधार ज्याने पिस्तूलमधून गोळीबार केला होता, त्याला पोलिसांनी बोरामणीच्या जंगलात पकडले. तो दिवसा नातेवाइकांकडे जायचा आणि रात्री बोरामणीच्या जंगलात झोपायला जात होता. पोलिसांना आपले लोकेशन समजू नये म्हणून तो मोबाईल देखील वापरत नव्हता. पोलिसांनी शक्कल लढविली आणि खबऱ्यांना कामाला लावले. तो बोरामणीच्या जंगलात गेल्याची खबर मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, उपनिरीक्षक महेश घोडके, सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक सांजेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडले. त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल देखील जंगलातील एका दगडाखाली पुरून ठेवले होते. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यारे, वाहने, पिस्तूल असे साहित्य जप्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.