श्रावण सोमवारी पहिल्यांदाच सागरेश्वर मंदिर परिसर सुनासुना 

विष्णू मोहिते
Monday, 27 July 2020

देवराष्ट्रे : नेहमी गर्दीने फुलणारा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दक्षिण काशी श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थान परिसर आजच्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी सुनासुना होता. कोरोनाच्या कारणास्तव सांगली जिल्हा लॉकडाऊन असल्याने भाविकांविना सागरेश्‍वर परिसर पहिल्यांदाच इतका सुन्न जाणवत होता. 

देवराष्ट्रे : नेहमी गर्दीने फुलणारा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दक्षिण काशी श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थान परिसर आजच्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी सुनासुना होता. कोरोनाच्या कारणास्तव सांगली जिल्हा लॉकडाऊन असल्याने भाविकांविना सागरेश्‍वर परिसर पहिल्यांदाच इतका सुन्न जाणवत होता. 

सह्याद्रीच्या डोंगररांगेत हिरव्यागार वनराईत सागरेश्वर देवस्थान आहे. याचा प्राचीन इतिहास आहे या मंदिराची स्थापना सत्तेश्वर नावाच्या राजाने केली असून परिसरात 47 मंदिरे असून 108 शिवलिंगे, पाण्याचे तीन कुंड आहेत. सागरेश्वर मंदिर संपूर्ण हेमाडपंथी असलेले सागरेश्वरचे हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

श्रावण मासात येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी राज्यातून परराज्यातून भाविक येत असतात. भाविक हर हर महादेवचा जयघोष करीत असतात श्रावण मासातील सोमवारी रात्री बारा वाजलेपासून यथे जलाभिषेक शिवलिंगास भाविक घालीत असतात. हि परंपरा वर्षानुवर्षा पासून सुरु आहे. जलाभिषेक घालण्यासाठी देशाचे उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर देवालयात येत होते. परंतु कोरोनामुळे वर्षानुवर्षा चालत असलेली जलाभिषेकेची परंपरा खंडित झाली आहे.ागरेश्वर मंदिर परिसर श्रावण मासात भाविकांची गर्दी होत होती. सध्या सागरेश्वर देवस्थान बंद आहे.स मुद्रेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांकडून मंदिर परिसर बंद केला करण्यात आला आहे. श्रावण मासात भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषाने गजबजणारे सगरेश्वर देवस्थान मंदिर यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांविना सुनेसुने वाटत आहे. 

 
छोटे व्यवसायिक आर्थिक संकटात 

सागरेश्वर मंदिर परिसरात नारळ, खेळणी, सौंदर्य साधने, लहान मुलांची खेळणी, हॉटेल्स आदी छोटे व्यावसायिक मंदिर बंद असल्याने आर्धिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या पोआपाण्याचा प्रश्‍नही सध्या गंभीर बनला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time on Shravan Monday, Sagareshwar temple premises were deserted